'भारतात पाकिस्तानी कलाकारांना..'; पलक तिवारीचं फोटोशूट पाहून संतापले पाक युजर्स, उठवली टिकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 02:04 PM2024-02-21T14:04:41+5:302024-02-21T14:05:12+5:30

Palak tiwari: पलकने एका प्रसिद्ध पाकिस्तानी डिझायनरसाठी फोटोशूट केलं असून हे फोटो पाहून पाकिस्तानी युजर्समध्ये संतापाची लाट उसळली आहे.

'Pakistani artists in India..'; Pak users got angry after seeing Palak Tiwari's photoshoot, started a strike | 'भारतात पाकिस्तानी कलाकारांना..'; पलक तिवारीचं फोटोशूट पाहून संतापले पाक युजर्स, उठवली टिकेची झोड

'भारतात पाकिस्तानी कलाकारांना..'; पलक तिवारीचं फोटोशूट पाहून संतापले पाक युजर्स, उठवली टिकेची झोड

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) हिने गेल्याच वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे ती सध्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. पलक इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासूनच नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली होती. त्यामुळे आजही ती या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. नुकतंच पलकने एका पाकिस्तानी डिझायनरसाठी फोटोशूट केलं. मात्र, हे फोटोशूट पाहिल्यावर पाकिस्तानी नागरिक चांगलेच संतापले असून त्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे.

अलिकडेच पलकने पाकिस्तानी डिझायनर फैजा सक्लेन (Pakistani Designer Faiza Saqlain) च्या लिलियाना या नव्या कॅम्पेनसाठी फोटोशूट केलं. फैजाने या फोटोशूटमधील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर शेअर केले होते. मात्र, हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे.

पलकने फैजाने डिझाइन केलेले अनेक डिझायनर ड्रेस परिधान करुन फोटोशूट केलं. हे फोटो पाहिल्यावर पाकिस्तानी नागरिक मात्र चांगलेच संतापले. आणि, त्यांनी फैजा, पलकला ट्रोल करायला सुरुवात केली.

नेमकं काय म्हणाले पाकिस्तानी ट्रोलर्स

'जर भारतात पाकिस्तानी कलाकारांना संधी देत नाही. तर मग, आपण का त्यांच्या कलाकारांना संधी देतो?', 'पाकिस्तानमधील अभिनेत्री, मॉडल्स यांचा तुडवडा निर्माण झालाय का?', 'या कलाकारांना का घेताय तुम्ही?', अशा कितीतरी कमेंट करत लोकांनी फैजाला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, सध्या फोटोशूटमुळे चर्चेत आलेली पलक यापूर्वी सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान याच्यामुळे चर्चेत आली होती. पलक आणि इब्राहिम एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

Web Title: 'Pakistani artists in India..'; Pak users got angry after seeing Palak Tiwari's photoshoot, started a strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.