'चंकी पांडेसोबत काम?'; अभिनेत्याचं नाव ऐकताच दिव्या भारतीने धुडकावला होता सुपरहिट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:00 PM2023-10-04T12:00:54+5:302023-10-04T12:02:23+5:30

Divya bharti: दिव्या भारतीने एका क्षुल्लक कारणामुळे नाकारली हिट सिनेमाची ऑफर

pahlaj-nihalani-said-divya-bharti-had-rejected-the-film-aankhen-due-to-chunky-pandey | 'चंकी पांडेसोबत काम?'; अभिनेत्याचं नाव ऐकताच दिव्या भारतीने धुडकावला होता सुपरहिट सिनेमा

'चंकी पांडेसोबत काम?'; अभिनेत्याचं नाव ऐकताच दिव्या भारतीने धुडकावला होता सुपरहिट सिनेमा

googlenewsNext

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते पहलाज निहलानी सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी कलाविश्वातील अनेक कलाकारांविषयी खुलासा केला आहे. यात दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिच्याविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलं. १९९३ मध्ये त्यांनी दिव्या भारतीला 'आंखे' या सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र, या सिनेमात केवळ चंकी पांडे आहे. या एका कारणामुळे तिने सिनेमात काम करण्यास नकार दिला होता.

अलिकडेच पहलाज निहलानी यांनी 'बॉलिवूड ठिकाना'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी दिव्या भारतीच्या स्वभावाविषयी, तिच्या हट्टीपणाविषयी भाष्य केलं.  "मी आंखे या सिनेमात दिव्या भारती, पूजा भट्ट आणि जुही चावला या तिघींना कास्ट करणार होतो. यात दिव्याच्या अपोझिट मी चंकीला घेण्याचा विचार करत होतो. पण, ही गोष्ट डेव्हिड धवनने दिव्याला सांगितली त्यावेळी ती अपसेट झाली. तिने लगोलग मला फोन केला आणि तिची नाटकं सुरु झाली", असं पहलाज म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "दिव्याच्या फोननंतर मी तिला भेटायला गेलो. तर तिने वाद घालायला सुरुवात केली. तुम्ही माझ्यासोबत चंकी पांडेला कास्ट करण्याचा विचार करताय? मी हो म्हटलं तर तिने लगेचच या सिनेमासाठी नकार दिला. तिला चंकी पांडेसोबत काम करायचं नव्हतं."

दरम्यान, वयाच्या १९ व्या वर्षीच दिव्या भारतीचं निधन झालं. ५ एप्रिल १९९३ मध्ये घराच्या बाल्कनीमधून खाली पडून तिचा मृत्यु झाला. परंतु, अल्पावधीत दिव्याने अनेक हिट सिनेमा दिले होते. त्यामुळे त्याकाळी टॉप अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव प्रथम स्थानावर होतं.

Web Title: pahlaj-nihalani-said-divya-bharti-had-rejected-the-film-aankhen-due-to-chunky-pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.