‘पद्मावती’मध्ये दीपिका थिरकणार ‘या’ लोकगीतावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 11:47 IST2016-11-18T11:47:01+5:302016-11-18T11:47:01+5:30
घोषणेपासूनच प्रचंड चर्चेत असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये दीपिका एका लोकगीतावर थिरकणार आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शक आहे म्हटल्यावर ते अपेक्षितही ...

‘पद्मावती’मध्ये दीपिका थिरकणार ‘या’ लोकगीतावर
घ षणेपासूनच प्रचंड चर्चेत असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये दीपिका एका लोकगीतावर थिरकणार आहे. संजय लीला भंसाळी दिग्दर्शक आहे म्हटल्यावर ते अपेक्षितही होते.
‘देवदास’, ‘राम-लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ अशा चित्रपटांमध्ये लोकसंगीताचा खुबीने वापर करणारे भंसाळी ‘पद्मावती’मध्येसुद्धा एक राजस्थानी लोकगीत अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने चित्रित करणार असून त्यांची मुंबईत शूटींगसुद्धा सुरू झाली आहे.
मुंबईतील मेहबुब स्टुडिओमध्ये दिमाखदार सेट उभारण्यात आला असून कडक सुरक्षेमध्ये सर्व तयारी करण्यात येत आली. सेट व दीपिकाचा लूक लीक होणार नाही याची पुरेपुर काळजी घेण्यात येतेय. असे असुनही आम्ही खास तुमच्यासाठी या गाण्याबाबत माहिती मिळवण्यात यशस्वी झालो आहोत.
या सिनेमाशी निगडीत एका सुत्राने सांगितले की, आम्ही गाण्याची शूटींग सुरू केली आहे. हे एक राजस्थानी लोकगीत असून अतिशय ग्रँड सेटवर आम्ही ते चित्रित करीत आहोत. शेकडो नृत्यकलाकारांसोबत दीपिका थिरकणार आहे. गाण्याचे नाव ‘घुमर’ असे आहे.
![]()
पारंपरिक वेशभूषा :दीपिका पदुकोन
सेटवर बॅकग्राउंड डान्सर लेहंगा, चोली आणि दुपट्टा आणि दागिने अशा पारंपरिक राजस्थानी वेशभूषेत होते. विशेष म्हणजे सध्या शाहरुखसुद्धा मेहबुब स्टुडिओमध्ये शूटींग करीत असून यावेळी तो दीपिकाला भेटायला गेला. दोघांमध्ये ‘कोल्ड वॉर’ असल्याच्या बातम्यांना खोटे ठरवत एसआरके-डिप्पी त्याच्या घरी पार्टी करताना दिसले होते.
‘पद्मावती’ एका ऐतिहासिक प्रेमकहाणी असून राणी पद्मावतीच्या भूमिकेत असून दीपिका तर शाहिद कपूर राजा रतन सिंगची भूमिका साकारत आहे. भंसाळीचा फेव्हरेट रणवीर मुघल सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’नंतर भंसाळी-दीपिका-रणवीर हे त्रिकुट या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे.