श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चेन्नई आणि हैदराबादवरुन 40 बसेस मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 09:12 AM2018-02-28T09:12:48+5:302018-02-28T14:42:48+5:30

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना धक्का बसला. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ...

In order to get the last glimpse of Sridevi, 40 buses from Chennai and Hyderabad get to Mumbai | श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चेन्नई आणि हैदराबादवरुन 40 बसेस मुंबईत दाखल

श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चेन्नई आणि हैदराबादवरुन 40 बसेस मुंबईत दाखल

googlenewsNext
रीदेवी यांच्या निधनाची बातमी संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना धक्का बसला. थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून चाहते त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन करण्यासाठी वाट पाहत होते. श्री देवी यांचे चाहते फक्त मुंबईत पुरते मर्यादित नसून संपूर्ण देशभरात आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई आणि हैद्राबादवरून ४० बस मुबंईमध्ये आल्या आहेत. यात श्रीदेवींचे चाहते आहेत जे श्रीदेवींच्या निधनाची बातमी कळताच आपले अंतिम दर्शनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहेत. सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अनेक सेलिब्रेटींची रिघ सकाळपासून या ठिकाणी लागली आहे.  दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. जवळपास साडेतीन वाजच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. ते कोणत्याही फिल्मी पार्टीत एकत्रच दिसायचे. आपल्या पत्नीच्या जाण्याने बोनी कपूर यांना प्रचंड धक्का बसला आहे. ते एखाद्या लहान मुलासारखे रडत आहेत. श्रीदेवींच्या निधनाने ते पूर्णपणे खचून गेले आहेत. 

श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.

ALSO READ :  भूतकाळ विसरून अर्जुन कपूर आणि अंशुलाने दिला जान्हवी, खुशीला आधार

Web Title: In order to get the last glimpse of Sridevi, 40 buses from Chennai and Hyderabad get to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.