अवघ्या 5 वर्षाच्या आराध्याची ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनला सतावतेय ही चिंता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 13:00 IST2017-03-04T07:19:28+5:302017-03-04T13:00:43+5:30

आपल्या मुलांनी खूप शिकून मोठे झाल्यानंतर काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.पालक बनलेले सेलिब्रेटीनाही अशाच ...

Only 5-year-old Aishwarya Bachchan and Abhishek Bachchan are worried about being persecuted? | अवघ्या 5 वर्षाच्या आराध्याची ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनला सतावतेय ही चिंता?

अवघ्या 5 वर्षाच्या आराध्याची ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनला सतावतेय ही चिंता?

ल्या मुलांनी खूप शिकून मोठे झाल्यानंतर काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.पालक बनलेले सेलिब्रेटीनाही अशाच काही गोष्टींची  चिंता त्यांनाही सतावत असते.अवघ्या 5 वर्षाची असलेल्या आराध्याची अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना आराध्याने तिच्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? या गोष्टीची चिंता सतावत असल्याचे कळते आहे. कधी कधी याच गोष्टीला या दोघांमध्ये वादही सुरू असतात.अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या ही फक्त 5वर्षाची आहे. दोघांनीही आराध्याने तिच्या करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडावे? यावर दोघांचेही वेगवेगळे मत आहे.अभिषेक बच्चनला वाटते की,आराध्याने मोठे झाल्यावर अभिनेत्री बनावे तर दुसरीकडे मॉम ऐश्वर्याचे आराध्याने सिनेसृष्टीपासून लांबच रहावे असे वाटते.कोणत्याही गोष्टीमुळे आराध्याला भविष्यात पश्चाताप होणार नाही अशाच गोष्टींवर तिने काम करावे, उगाच कॅमेरा,झगमगाट यामध्ये अडकण्यापेक्षा तिला त्यावेळी जे वाटेन तेच ती करणार असल्याचे ऐश्वर्याने एका कार्यक्रमात म्हटले होते.त्यासाठी आराध्याला माझा फुल सपोर्ट असणार असल्याचे ऐश्वर्याने सांगितले होते. 2007मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले होते.लग्नाचे दहा वर्ष पूर्ण केल्यानंतर आता लाडली आराध्याच्या चिंतेमुळे हे सेलिब्रेटी पालक अशाच क्षुल्लक कारणांवर भांडत असतात.ब-याचदा ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही आराध्याविषयी अनेक गोष्टी मीडियासमोर सांगत असतात.असेच काहीसे करिना कपूर खाननेही केले होते.करिनाची सावत्र मुलगी सारा अली खानच्या करिअरला घेवून चक्क सैफअली खानशी भांडली होती.मुळात साराचा आवडीचा प्रश्न आहे.पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू देण्यासाठी रोखण्यापेक्षा त्यांना पालक म्हणून मदत करणे हीच त्यांची पहिली जबाबदारी असते असेही करिनाने म्हटले होते.  

Web Title: Only 5-year-old Aishwarya Bachchan and Abhishek Bachchan are worried about being persecuted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.