"एकतर्फी प्रेम टॉर्चर असतं...", करण जोहरने तुटलेल्या नात्यावर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:29 IST2025-05-08T12:29:05+5:302025-05-08T12:29:45+5:30

Karan Johar : करण जोहर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याने सर्वोत्तम प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर सादर केली आहेत. मात्र त्याला खऱ्या आयुष्यात प्रेमात यश मिळालेलं नाही. अलिकडेच त्याने एका मुलाखतीत त्याच्या एकतर्फी प्रेमाबद्दल सांगितले.

''One-sided love is torture...'', Karan Johar breaks silence on broken relationship | "एकतर्फी प्रेम टॉर्चर असतं...", करण जोहरने तुटलेल्या नात्यावर सोडलं मौन

"एकतर्फी प्रेम टॉर्चर असतं...", करण जोहरने तुटलेल्या नात्यावर सोडलं मौन

करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याने सर्वोत्तम प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर सादर केली आहेत. मात्र त्याला खऱ्या आयुष्यात प्रेमात यश मिळालेलं नाही. अलिकडेच त्याने एका मुलाखतीत त्याच्या एकतर्फी प्रेमाबद्दल सांगितले. 

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने राज शमनीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या एकतर्फी प्रेमाबद्दलचा खुलासा केला. करण जोहरने ही भावना जगातील सर्वात वाईट भावना असल्याचे सांगितले आणि त्याला असे का वाटते याबद्दल सांगितले. त्याने प्रेमात पडण्यापेक्षा दुर्दैवी काहीही नाही हे उघड केले. तो म्हणाला की, ''जर प्रेम एकतर्फी असेल तर माणूस सर्वात वाईट रुप धारण करतो. करण पुढे म्हणाला की, अनेकदा असे वाटते की त्याच्या छातीवर काहीतरी जड आहे.''

''तुमचे मन नेहमीच विचलित असते...''

करण म्हणाला, ''प्रेमासारखी कोणतीच गोष्ट बनली नाही आणि कधीच बनणार नाही. शारीरिक वेदना असतात, हृदयविकाराचा त्रास नाही, पण वेदना असतात. तुम्हाला अस्वस्थ वाटते, तुम्हाला श्वास घेता येत नाही. जेव्हा तुमचे प्रेम एकतर्फी असते तेव्हा तुम्ही स्वतःचे सर्वात वाईट रूप बनता... तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमच्या छातीवर खूप जड काहीतरी ठेवले आहे. तुम्ही तुमचा फोन सतत तपासत राहता, जर ती व्यक्ती ऑनलाइन असेल तर त्याने फोन का केला नाही, तो कुठे असेल. तुमचे मन नेहमीच विचलित असते. ही यातना आहे, एकतर्फी प्रेम.''

करण जोहरने अशी केली एकतर्फी प्रेमावर मात 
या मुलाखतीत करण जोहरने सांगितले की तो त्याच्या एकतर्फी प्रेमातून कसा बाहेर पडला. दिग्दर्शकाने स्पष्ट केले की, ''एकदा त्याने त्याच्या प्रेमाकडे अशा रुपात पाहायला सुरूवात केली की ज्याने तो सशक्त बनत गेला आणि त्यातून बाहेर पडू शकला.'' तो पुढे म्हणाला की, ''त्याला लवकरच जाणवले की तो ज्या प्रेमाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करत होता ते त्याचे नाही.'' तो म्हणाला, ''जेव्हा मी एकतर्फी प्रेमाला भावनेची शक्ती म्हणून पाहिले, तेव्हा त्याने मला सक्षम केले, नंतर मी ते सोडून दिले. तसेही ते प्रेम माझे नव्हतेच.''

एकतर्फी प्रेम निगेटिव्ह नव्हते
करण जोहर पुढे म्हणाला की,''हा जगातील सर्वात वाईट अनुभव होता आणि यामुळे खूप त्रास होतो. एकतर्फी प्रेमातून जात असलेल्या लोकांबद्दल मला खूप सहानुभूती आहे... माझे प्रेम अफाट होते, ते प्रेम होते, एकतर्फी पण कधीही नकारात्मक नव्हते. मी कधीही अशा व्यक्तीचा द्वेष केला नाही किंवा वाईट चिंतले नाही जो माझ्या प्रेमाची परतफेड करू शकत नाही.''

Web Title: ''One-sided love is torture...'', Karan Johar breaks silence on broken relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.