एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:19 PM2020-01-08T15:19:43+5:302020-01-08T15:20:47+5:30

Chhapaak Movie : कंगना रानौतने या कारणासाठी दीपिका पदुकोणचे मानले आभार

On the one hand #BoycottChhapaak is trending, Kangana Ranaut thank to Deepika Padukone | एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार

एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार

googlenewsNext


बॉलिवूडची कॉन्ट्रॉव्हर्शियल क्वीन कंगना रानौत सध्या तिचा आगामी चित्रपट 'पंगा'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. कंगना फार क्वचितच कौतूक करताना दिसते. एकीकडे दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये विद्यार्थ्याच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र कंगनाने दीपिका पदुकोणच्या छपाक चित्रपटाची प्रशंसा केली. तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका व मेघना गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा छापाक ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.


कंगनाचा हा व्हिडीओ बहीण रंगोलीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगना म्हणाली, ‘मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या बहीणीनं त्यानंतर जी हिंमत दाखवली ती मला प्रेरित करते. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी सामना करण्याची ताकद देते. तिचं हसणं मला प्रत्येक दुःख व वाईट प्रसंगांशी लढण्याची ताकद देते.'




कंगना पुढे म्हणाली, 'आज मी दीपिका आणि मेघना गुलजार यांचे आभार मानते कारण त्यांनी त्यांनी या मुद्द्यावर सिनेमाची निर्मिती केली. ज्यामुळे त्या मुलींना त्याच्या आयुष्यात हिंमत मिळेल. हा सिनेमा त्या लोकांना मिळालेली चपराक आहे. जे त्यांच्या कामात यशस्वी झाले पण ज्यासाठी त्यांनी हे केलं होतं तो त्यांची हेतू मात्र पूर्णत्वास जाऊ शकला नाही. आज या सिनेमामुळे त्या प्रत्येक चेहऱ्यावर हसू असेल ज्यांनी अ‍ॅसिड हल्ला करुन या मुलींचा चेहरा खराब केला होता. आशा करते की या नव्या वर्षात अ‍ॅसिड विक्रीवर बंदी यावी ज्यामुळे आपला देश अ‍ॅसिड हल्ल्यापासून मुक्त होऊ शकेल.’


Web Title: On the one hand #BoycottChhapaak is trending, Kangana Ranaut thank to Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.