एकेकाळी सलमान खानकडे जीन्स विकत घेण्यासाठी देखील नव्हते पैसे, त्यावेळी या अभिनेत्यानं केली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:26 IST2022-06-22T16:25:52+5:302022-06-22T16:26:28+5:30

Salman Khan: आयफा शोमधील एका प्रोमोची सध्या सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खान भावुक झालेला दिसला.

Once upon a time Salman Khan didn't even have money to buy jeans, at that time this actor had helped | एकेकाळी सलमान खानकडे जीन्स विकत घेण्यासाठी देखील नव्हते पैसे, त्यावेळी या अभिनेत्यानं केली होती मदत

एकेकाळी सलमान खानकडे जीन्स विकत घेण्यासाठी देखील नव्हते पैसे, त्यावेळी या अभिनेत्यानं केली होती मदत

बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अवॉर्ड शो आयफा(IIFA)ला अबुधाबीमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. हा दिमाखदार सोहळा २५ जून रोजी रात्री ८ वाजता कलर्सवर प्रसारित होईल. या शोचे अनेक प्रोमो रिलीज झाले आहेत. यातील एका प्रोमोची बरीच चर्चा झाली आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) भावुक झालेला दिसला.

प्रोमो व्हिडिओमध्ये, सुनील शेट्टीच्या मदतीबद्दल सांगताना सलमान खानचे डोळे पाणावले. पैसे नसताना सुनील शेट्टीने त्याला महागडा शर्ट कसा भेट दिला. व्हिडिओमध्ये, होस्ट मनीष पॉलने सलमान खानला त्याच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणाबद्दल विचारले. या अविस्मरणीय क्षणाची आठवण करून देताना सलमान खान म्हणाला की, अनेक वर्षांपूर्वी पैसा असा नव्हता. सुनील शेट्टी अण्णांचे दुकान होते. एके दिवशी मी तिथे गेलो. ते एक महागडे दुकान होते. तिथे मला शर्ट आणि जीन्सशिवाय इतर गोष्टी घेणे परवडत नव्हते. म्हणून मी एक जीन्स उचलली. सुनीलने पाहिले की माझ्याकडे पैसे नाहीत.

तेव्हा सुनीलने त्याच्याकडून मला तो शर्ट दिला. सुनीलने पाहिले की माझी नजर एका पर्सवर आहे. यानंतर सलमान खानचे डोळे पाणावले. त्याला काहीही बोलणे कठीण झाले. अवॉर्ड शोमध्ये तो चालत सुनील शेट्टीचा मुलगा अहानकडे गेला. अहानने सलमान खानला मिठी मारली. सलमानच्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर सलमान पुढे म्हणाला, सुनील मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्याकडे ती पर्स होती. तेही त्याने मला दिली. सलमान खानचे हे बोलणे ऐकल्यानंतर आयफाचा मंचावर टाळ्यांचा कडकडाट झाला. 
हा प्रोमो व्हिडिओ पाहून सलमान खानचे चाहते खूप भावुक झाले होते. त्याचवेळी लोक सुनील शेट्टीचे कौतुक करताना दिसले. एका यूजरने लिहिले - हे खूप भावनिक आहे. सलमानवरही अशी वेळ आली होती. सुनील शेट्टीसारखा मित्र प्रत्येकाला हवा. चाहते व्हिडिओवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Once upon a time Salman Khan didn't even have money to buy jeans, at that time this actor had helped