OMG ! ​गर्लफ्रेन्ड नताशाच्या हट्टापुढे पुन्हा एकदा झुकला वरूण धवन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 15:51 IST2018-01-01T10:21:40+5:302018-01-01T15:51:40+5:30

कदाचित गर्लफ्रेन्ड नताशा दलाल हिची मर्जी राखण्यासाठी वरूण धवन काहीही करायला तयार आहे. होय, कधीकाळी वडिलांचे घर न सोडण्याची ...

OMG! Varun Dhawan again bowed before Natwar's knock! | OMG ! ​गर्लफ्रेन्ड नताशाच्या हट्टापुढे पुन्हा एकदा झुकला वरूण धवन!!

OMG ! ​गर्लफ्रेन्ड नताशाच्या हट्टापुढे पुन्हा एकदा झुकला वरूण धवन!!

ाचित गर्लफ्रेन्ड नताशा दलाल हिची मर्जी राखण्यासाठी वरूण धवन काहीही करायला तयार आहे. होय, कधीकाळी वडिलांचे घर न सोडण्याची शपथ घेणा-या वरूणने अलीकडे नवे घर खरेदी केले. नताशाच्या हट्टापायी वरूणला म्हणे, आई वडिलांचे घर सोडावे लागले. वरूण व नताशा दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण अलीकडे या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली होती. यामागे कारण होते, नताशाचा हट्ट. वरूण आपल्या आईवडिलांचे घर सोडायला तयार नव्हता. पण नताशाला एकत्र कुटुंब नको होते. तिला वरूणसोबत वेगळे राहायचे हाते. वरूणच्या लाख मिणत्या केल्यानंतरही नताशा मानली नाही आणि अखेर नताशाच्या हट्टापुढे वरूणलाच झुकावे लागले. केवळ नताशासाठी वरूणने नवे घर घेतले. म्हणजेच वरूणने नताशाचा एक हट्ट पूर्ण केला. पण कदाचित इतके पुरे नाही. नताशा म्हणे, आणखी एका गोष्टीसाठी वरूणकडे हट्ट करू लागल्याचे कळतेय. हा हट्ट कुठला तर लग्नाचा. चर्चा खरी मानाल तर नताशाच्या हट्टापायी वरूण म्हणे लग्नासाठी तयार झाला आहे. खरे तर वरूणकडे लग्नासाठी बराच वेळ आहे. आत्ता कुठे जेमतेम त्याचे करिअर सुरु झाले आहे. पण नताशाला मात्र लग्नाची प्रचंड घाई झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती  लग्नासाठी वरूणच्या मागे पडली आहे.   त्यामुळे येत्या नव्या वर्षांत अनुष्का शर्मा व विराट कोहलीपाठोपाठ लग्नबंधनात अडकू शकतो.

ALSO READ : ​वरूण धवनने खरेदी केलेले नवे घर तुम्ही पाहिलेत? नसेल तर पाहा हा खास व्हिडिओ!

वरूण धवन लवकरच शूजित सरकारच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच वरूणने या चित्रपटाचे शूटींग संपवले.आधी हा चित्रपट रणबीर कपूरला आॅफर झाला होता. पण ऐनवेळी यात वरूणची वर्णी लागली. या चित्रपटाशिवाय  शरत कटारिया यांच्या ‘सुई धागा’ या चित्रपटातही वरूण दिसणार आहे. यात तो अनुष्का शमार्सोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल.

Web Title: OMG! Varun Dhawan again bowed before Natwar's knock!