अबब ! इतक्या कोटी संपत्तीची मालकीण आहे एकटी शिल्पा शेट्टी,आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 12:43 IST2021-08-06T12:35:52+5:302021-08-06T12:43:17+5:30

गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. राजच्या अटकेनंतर शिल्पाला जबरदस्त ट्रोल केलं जातंय.

OMG Shilpa Shetty's net worth that will leave you shocked | अबब ! इतक्या कोटी संपत्तीची मालकीण आहे एकटी शिल्पा शेट्टी,आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

अबब ! इतक्या कोटी संपत्तीची मालकीण आहे एकटी शिल्पा शेट्टी,आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

शिल्पा शेट्टीसध्या पती राज कुंद्रामुळे प्रचंड चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव समोर आल्यापासून राज कुंद्राविषयीच्या नवनवीन माहिती समोर येत आहेत. यापूर्वी शिल्पा शेट्टीचा पती म्हणून त्याची ओळख होती. आता पती राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टी चर्चेत आहे. राज कुंद्राला अटक झाल्यापासून त्याची संपत्तीविषयीही माहिती समोर आली होती.

आता त्याच्यापाठोपाठ शिल्पा शेट्टीच्याही संपत्तीविषयी चर्चा रंगत आहेत. अभिनयान आणि सौंदर्याने शिल्पाने अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.डवत त्यांनी दो अंजाने सिनेमातून दमदार एंट्री केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टी गणली जाते. 

 आपल्या अदाकारिने रसिकांच्या मनं जिंकणारी शिल्पा शेट्टीही कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे.एका सिनेमासाठी ती १ ते २ करोड रुपये मानधन आकारत होती तर टीव्हीवरील रिएलिटी शोमध्ये जज म्हणून झळकण्यासाठी शिल्पा शेट्टी एपिसोडप्रमाणे १७ ते १८ लाख इकते मानधन घेते.  सिनेमांशिवाय जाहिराती आणि ब्रँड एन्डॉर्समेंटही आहेत. एकुण १३४ कोटींच्या संपत्तीची मालकीण शिल्पा शेट्टी असल्याचे बोलले जाते.

शिल्पा शेट्टीने व्यावसायिक राज कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर राज कुंद्रानेही तिच्या नावावर काही संपत्ती केल्या आहेत. इतकेच काय तर राज कुंद्राच्या काही कंपनीची शिल्पा शेट्टीही मालकीण आहे. शिल्पा आणि राज यांना दोन मुले देखील आहेत, ज्यांची नावे वियान आणि समिशा आहेत. शिल्पा शेट्टीही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे.

गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. राजच्या अटकेनंतर शिल्पाला जबरदस्त ट्रोल केलं जातंय. पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी शिल्पाचीही चौकशी केली गेली होती.राज कुंद्राचे प्रकरण समोर आल्यानंतर शिल्पा शेट्टीच्याही अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडिपासून ती लांब आहे. इतकेच काय तर 'सुपर डान्सर चॅप्टर ४' सिझनमध्ये शिल्पा जजच्या भूमिकेत झळकत होती. मात्र आता या शोमध्येही ती झळकत नाही. सिनेसृष्टीतील काही दिग्गज सेलिब्रेटी शिल्पाला सपोर्ट करतानाही दिसत आहेत.
 

Web Title: OMG Shilpa Shetty's net worth that will leave you shocked