OMG..! शर्लिन चोप्रानं वेबसीरिजसाठी केलं हॉट फोटोशूट, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 06:00 IST2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:00+5:30

शार्लिनने नुकतेच तिच्या आगामी वेब सीरिजच्या लूक टेस्टसाठी फोटोशूट केलं

OMG ..! Sherlyn Chopra did a hot photoshoot for the webseries, see these photos | OMG..! शर्लिन चोप्रानं वेबसीरिजसाठी केलं हॉट फोटोशूट, पहा हे फोटो

OMG..! शर्लिन चोप्रानं वेबसीरिजसाठी केलं हॉट फोटोशूट, पहा हे फोटो

अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडेच रॅपर, कॉन्टेंट क्रिएटर व निर्मातीदेखील बनली आहे. काही दिवसांपूर्वी शर्लिनने एक रॅप साँग लाँच केलं. या गाण्याचं खूप कौतूक झालं. या गाण्यानंतर तिला बऱ्याच प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत आहेत आणि ती सध्या बिझी आहे.

शार्लिनने नुकतेच तिच्या आगामी वेब सीरिजच्या लूक टेस्टसाठी फोटोशूट केलं.

याबाबत ती म्हणाली, “एक अभिनेता आणि निर्माता म्हणून मी माझा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सीरिज सुरू करणार आहे. ही वेब सीरिज वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीजचे संकलन असेल आणि प्रत्येक कथेत तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखेत आणि एका नवीन अवतारात पाहू शकणार आहे.


ती पुढे म्हणाली, “या फोटोशूटद्वारे आम्ही एक लूक टेस्ट करीत आहोत, त्यातून आम्ही आता ६ पैकी ३ लूक निवडत आहोत, हे पात्र भारतीय महिलांशी प्रेरित आहे. मी वेस्टर्नपेक्षा जास्त भारतीय वेषभूषावर लक्ष केंद्रित करत आहे.


शर्लिनचं लवकरच दुसरं रॅप प्रदर्शित करणार आहे. या रॅपबद्दल ती म्हणाली की, हे नवीन वूमन एम्पॉवेरिंग गाणं असणार आहे.

तसेच तिची वेब सीरिज नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: OMG ..! Sherlyn Chopra did a hot photoshoot for the webseries, see these photos