OMG!! शाहरूख खलनायक अन् रणवीर पोलिस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 17:02 IST2016-08-20T11:32:36+5:302016-08-20T17:02:36+5:30
होय, किंगखान शाहरूख खान हा खलनायक आणि बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंह हा पोलिस बनणार असल्याची खबर आहे. ‘धूम’ फ्रेंचाइसीमधला ...

OMG!! शाहरूख खलनायक अन् रणवीर पोलिस?
ह य, किंगखान शाहरूख खान हा खलनायक आणि बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंह हा पोलिस बनणार असल्याची खबर आहे. ‘धूम’ फ्रेंचाइसीमधला ‘धूम4’ची पुन्हा जोरात चर्चा सुरु झाली आहे आणि यात शाहरूख - रणवीरची जोडी दिसणार या नव्या चर्चेला जोर चढला आहे. याआधी ‘धूम4’साठी सलमान खानचे नाव चर्चेत होते. तो यात विलन बनणार असल्याची बातमी होती. मात्र पडद्यावर विलन बनणे आवडणार नाही, असे सलमानने स्पष्ट केल्याने आता या भूमिकेसाठी शाहरूखचे नाव पुढे आले आहे. सगळे काही जमून आले तर शाहरूख ‘धूम4’मध्ये विलन साकारताना दिसेल. एवढेच नाही तर रणवीर सिंह हाही या चित्रपटात जय दीक्षित या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसू शकतो. यापूर्वीच्या ‘धूम’च्या तिन्ही सिक्वलमध्ये अभिषेक बच्चन जयची भूमिका साकारताना दिसला होता. मात्र आता या भूमिकेसाठी रणवीरच्या नावाचा विचार सुरु आहे. अलीची भूमिका मात्र याही वेळी उदय चोपडा हाच साकारताना दिसणार आहे. अर्थात ही चर्चा आहे. प्रत्यक्षात ‘धूम4’मध्ये कुणाची वर्णी लागते, ते बघूच!!