OMG !! संजय दत्तचा ‘डेली सोप’ला नकार? पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:53 IST2017-09-08T10:23:03+5:302017-09-08T15:53:03+5:30

संजय दत्तचा ‘भूमी’ हा चित्रपट येतोय.  या चित्रपटातून संजय दमदार कमबॅक करतोय. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल संजय कमालीचा ...

OMG !! Sanjay Dutt refuses 'Daily Soap' But why? | OMG !! संजय दत्तचा ‘डेली सोप’ला नकार? पण का?

OMG !! संजय दत्तचा ‘डेली सोप’ला नकार? पण का?

जय दत्तचा ‘भूमी’ हा चित्रपट येतोय.  या चित्रपटातून संजय दमदार कमबॅक करतोय. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल संजय कमालीचा उत्सूक आहे. पण एका गोष्टीवरून मात्र सध्या संजयचा मूड बिघडलेला आहे. होय, सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर संजय आणि ‘भूमी’चा निर्माता संदीप सिंह यांच्या गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तणाव वाढला आहे. याचे कारण काय, तर म्हणे प्रमोशन स्ट्रॅटेजी.
होय, काळाची गरज लक्षात घेता, ‘भूमी’चे आक्रमक प्रमोशन करण्यावर निर्मात्याचा जोर आहे. पण संजयला म्हणे, हे अजिबात मान्य नाही. याचवरून गेल्या काही दिवसांपासून संजय व संदीप यांच्यात वादविवाद सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या काळात प्रमोशन किती गरजेचे आहे, हे संदीपने अनेक प्रकारे संजयला पटवून देण्याचे प्रयत्न केलेत. पण संजय काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. संजयने प्रमोशनसाठी काही लोकप्रीय टीव्ही शोमध्ये जावे, काही टूर करावेत, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. यासाठी संदीपला रोज संजयच्या घराच्या वाºया कराव्या लागत आहेत. गेल्या आठवड्यात संजय एक-दोन रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसला. पण तो सुद्धा मानमान मिनत्या केल्यानंतर.  ‘ड्रामा कंपनी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या शूटपूर्वी संदीप आणि संजय यांच्या मोठा वाद झाल्याचेही कळतेय. ‘सा रे गा मा’ हा लहान मुलांचा शो असल्याने संजय यात जाण्यासाठी मानला. पण टीव्हीवरील अन्य डेली सोपमध्ये जाण्यास संजयने ठाम नकार दिला आहे. अर्थात याबद्दल संजयला विचारल्यावर या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. तिकडे संदीपनेही असे काहीही नसल्याचे म्हटलेय. संजय व संदीप दोघेही म्हणताहेत, त्याप्रमाणे या अफवाच निघो आणि ‘भूमी’ मार्गाला लागो...एवढीच काय ती चाहत्यांची इच्छा. होय ना?

ALSO READ : 4 am ROMANCE CLICK : ​पहाटे ४ वाजता संजय दत्तला आले मान्यतावर प्रेम!!

 

Web Title: OMG !! Sanjay Dutt refuses 'Daily Soap' But why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.