बाबो..! दिशा पटानीच्या ओठांवर टेप लावून सलमान खाननं दिला किसिंग सीन, भाईजानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 21:46 IST2021-05-11T21:45:27+5:302021-05-11T21:46:01+5:30

राधेः योर मोस्ट वॉण्टेड भाईच्या ट्रेलरमधील सलमान खान आणि दिशा पटानीच्या किसिंग सीनची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

OMG..! Salman Khan gave a kissing scene by tapping Disha Patani's lips | बाबो..! दिशा पटानीच्या ओठांवर टेप लावून सलमान खाननं दिला किसिंग सीन, भाईजानचा खुलासा

बाबो..! दिशा पटानीच्या ओठांवर टेप लावून सलमान खाननं दिला किसिंग सीन, भाईजानचा खुलासा

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याचा आगामी चित्रपट राधेः योर मोस्ट वॉण्टेड भाईमुळे चर्चेत येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून यातील सलमान खान आणि दिशा पटानीच्या किसिंग सीनची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. किसिंग सीन न देणाऱ्या सलमानने त्याचा इतक्या वर्षाचा नियम कसा मोडला, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. मात्र त्याने या सिनेमात दिशाला किस केले का, याचा खुलासा खुद्द त्याने केला आहे.


राधे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत सलमान खान म्हणाला की, मी दिशाला किस केलेले नाही. मी शूटिंगवेळी केवळ टेपला किस केले होते. ‘मैने प्यार किया’च्या शूटिंगवेळीही मी किसिंग सीन दिला नव्हता. त्यावेळी मी केवळ काचेवर जे लिपस्टिकचे मार्किंग करण्यात आले होते, त्यालाच किस केले होते. त्या सिनेमातील अभिनेत्री काचेच्या दुसऱ्या बाजूला होती.


तर दिशा पटानीनेदेखील या संदर्भात एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सिनेमात काम करताना आम्हाला दिग्दर्शक जे सांगेल ते ऐकावे लागते. आम्ही कलाकार आहोत. पण या सिनेमात खरेच सलमानने मला किस केलेले नाही. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष सिनेमा बघाल तेव्हा नक्की काय घडले आहे हे लक्षात येईल. सलमानने त्याचा नियम तोडलेला नाही.


राधे चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी सोबत रणदीप हुडा, जॅकी श्रॉफ आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: OMG..! Salman Khan gave a kissing scene by tapping Disha Patani's lips