OMG: एका हॉटेलच्या रुममध्ये होते रणबीर आणि आलिया ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 19:00 IST2018-11-19T19:00:00+5:302018-11-19T19:00:00+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपच्या चर्चा आहेत. दोघांनी मात्र अजून ही गोष्ट अधिकृतरित्या कधीच स्वीकारली नाही.

OMG: Ranbir and Alia were in a hotel room? | OMG: एका हॉटेलच्या रुममध्ये होते रणबीर आणि आलिया ?

OMG: एका हॉटेलच्या रुममध्ये होते रणबीर आणि आलिया ?

ठळक मुद्दे पुढच्या वर्षी हे कपल लग्नाच्या बेडीत अडू शकतोगतवर्षी पासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपच्या चर्चा आहेत. दोघांनी मात्र अजून ही गोष्ट अधिकृतरित्या कधीच स्वीकारली नाही. तरीही सार्वजनिक ठिकाणी, पार्टीमध्ये दोघे एकत्र येताना स्पॉट झाले आहेत.   


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार रणबीर आणि आलिया नुकतचे मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या वर्षी हे कपल लग्नाच्या बेडीत अडू शकतो.  दोघांच्या कुटुंबीयांकडून देखील त्यांच्या नात्याला मान्यता देण्यात आलेली आहे.  रणबीरची आई नीतू सिंगसोबत आलियाचे चांगले बाँड आहे तर आलियाची आई सोनी राजदान रणबीरची फॅन आहे. गतवर्षी पासून त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. न्यूयॉर्कमध्ये रणबीरसोबत आलियादेखील पोहोचली होती.  

 ब्रह्मास्त्र चित्रपटात आलिया व रणबीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते.  हे दोघे सध्या या सिनेमाचे चित्रीकरण करत आहेत. नुकताच दोघांचा सेटवरच एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. यात फोटोत रणबीर फोनमध्ये बिझी दिसतोय तर आलिया काहीशी उदास बसलेली दिसतेय. सेटवरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भटरणबीर कपूरच्या डाएटकडे लक्ष देत अाहे. इतकेच नाही तर तिने रणबीरसाठी डाएट चार्ट बनवला असून त्यातून जंक फूड काढून टाकले आहेत आणि रणबीर अालियाने सांगितलेला डाएटचे काटेकोरपणे पालन करतो आहे.

Web Title: OMG: Ranbir and Alia were in a hotel room?