​OMG राखी सावंतने बाबा रामदेव यांना दिले हे विचित्र चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 11:51 IST2017-12-27T06:21:18+5:302017-12-27T11:51:18+5:30

राखी सावंत प्रसिद्धीची एकही संधी सोडत नाही. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचा फायदा उठवत ती सध्या पब्लिसिटी कमवत आहे. विराटने ...

OMG Rakhi Sawant gave Baba Ramdev a strange challenge | ​OMG राखी सावंतने बाबा रामदेव यांना दिले हे विचित्र चॅलेंज

​OMG राखी सावंतने बाबा रामदेव यांना दिले हे विचित्र चॅलेंज

खी सावंत प्रसिद्धीची एकही संधी सोडत नाही. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचा फायदा उठवत ती सध्या पब्लिसिटी कमवत आहे. विराटने अनुष्कासोबत लग्न केल्यामुळे मला खूप वाईट वाटले, माझे हृदय विराटने तोडले असे तिने नुकतेच म्हटले होते. एवढेच नव्हे तर अनुष्का आणि विराट यांना एक स्पेशल गिफ्ट देण्याची तिची इच्छा आहे. तिने सांगितले आहे की, मी ज्या कंडोम ब्रॅण्डला प्रमोट करीत आहे. ते कंडोम मला अनुष्का आणि विराट यांना गिफ्ट म्हणून द्यायचे आहे. त्या ब्रॅण्डचे पहिले ग्राहक अनुष्का आणि विराट या दाम्पत्याने बनावे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचा अनुभवही लोकांशी शेअर करावा. काही दिवसांपूर्वीच राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना तिच्या फेव्हरेट कंडोम फ्लेवरची माहिती दिली होती. या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. तसेच कंडोम जाहिरातीच्या प्रसारणावर सरकारने घातलेल्या बॅनवरही राखीने सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, आता राखीने विरुष्काबद्दल वक्तव्य करून पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. राखीने म्हटले की, ‘विराट कोहली आणि अनुष्का शर्मा खूपच प्रेमळ कपल आहे. या दोघांनी आताच त्यांच्या वैवाहिक जीवनात पाऊल ठेवले आहे. मी माझ्या ब्रॅण्डचे कंडोम त्यांना गिफ्ट करू इच्छिते. जेणेकरून ते सुरक्षित राहावेत. तसेच मला असे वाटते की, त्यांनी त्यांचे अनुभव लोकांशी शेअरही करावेत.  
अनुष्का आणि विराट यांना गिफ्ट देण्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर आता राखीने एक वेगळेच वक्तव्य केले आहे. तिने आता पंताजलीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांना एक आव्हान दिले आहे. बाबा रामदेव यांनी पतांजलीचा कंडोम लाँच करावा असे तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. राखीने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओत म्हटले आहे की, बाबा रामदेव जर तुमच्यामध्ये दम असेल तर पतांजली कंपनीच कंडोम बाजारात आणा. 

Also Read : राखी सावंतला मिळाला तिचा सैफ अली खान, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पहा!

Web Title: OMG Rakhi Sawant gave Baba Ramdev a strange challenge