OMG!  प्रेग्नंट एमी जॅक्सनने चक्क शेअर केला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ; क्षणात झाला व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 12:56 IST2019-06-06T12:55:07+5:302019-06-06T12:56:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन प्रेग्नंट आहे, हे आताश: अख्ख्या जगाला कळले आहे. याचे कारण म्हणजे,  प्रेग्नंसीकाळातील बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. आता तर  फोटो व व्हिडीओ सोडाच या बयाने चक्क हॉस्पीटलमधला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ शेअर केला आहे.  

OMG! pregnant amy jackson ultrasound video is going viraL on internet | OMG!  प्रेग्नंट एमी जॅक्सनने चक्क शेअर केला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ; क्षणात झाला व्हायरल!!

OMG!  प्रेग्नंट एमी जॅक्सनने चक्क शेअर केला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ; क्षणात झाला व्हायरल!!

ठळक मुद्देएमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.  एमीने ‘एक दिवाना था’ या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन प्रेग्नंट आहे, हे आताश: अख्ख्या जगाला कळले आहे. गेल्या काही दिवसांपासून  तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. याचे कारण म्हणजे,  प्रेग्नंसीकाळातील बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. आता तर  फोटो व व्हिडीओ सोडाच या बयाने चक्क हॉस्पीटलमधला अल्ट्रा साऊंड व्हिडीओ शेअर केला आहे.  सध्या एमीचा हा अल्ट्रा साऊंड व्हिडीओ व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत एमीच्या पोटातील बाळाची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे.  


एमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आणि यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.  साहजिकच या व्हिडीओवरच्या प्रतिक्रियाही आल्या. केवळ इतकेच नाही तर एमीला मुलगा होईल की मुलगी, यावरूनही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.

  व्हिडिओमध्ये एमीच्या चेह-यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. एमी आणि तिचा होणारा नवरा (एमी व जॉर्जचे अद्याप लग्न झालेले नाही)जॉर्ज त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी प्रचंड उत्सुक आहेत.


 यावर्षी नवीन वर्षांच्या संध्येला बॉयफ्रेन्ड जॉर्जसोबत एमीने साखरपुडा केला होता. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती. बाळाच्या जन्मानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये एमी व जॉर्ज लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.   जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.
  एमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.  एमीने ‘एक दिवाना था’ या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

Web Title: OMG! pregnant amy jackson ultrasound video is going viraL on internet