OMG : लॉन्च होताच गूगलने बॅन केले पूनम पांडेचे ‘बोल्ड अॅप’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:50 IST2017-04-18T07:58:57+5:302017-04-18T15:50:29+5:30
-Ravindra More पूनम पांडेच्या बोल्ड अॅपची जे आतुरतेने वाट पाहत होते अशा फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. पूनम पांडेने ...
.jpg)
OMG : लॉन्च होताच गूगलने बॅन केले पूनम पांडेचे ‘बोल्ड अॅप’!
पूनम पांडेच्या बोल्ड अॅपची जे आतुरतेने वाट पाहत होते अशा फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. पूनम पांडेने सोमवारी आपले हे बोल्ड अॅप लॉन्च केले होते, मात्र काही वेळातच गूगलने हे अॅप बॅन केले.
सोमवारी दुपारी ३ वाजता हे अॅप डाउनलोडसाठी लॉन्च करण्यात आले होते, मात्र काही वेळातच फॅन्सला हे अॅप डाउनलोड करण्यास अडचणी येऊ लागल्या.
पूनम पांडेने या अॅपसोबत काही हॉट आणि बोल्ड फोटोजदेखील प्रमोशन केले होते, मात्र काही वेळानंतरच अॅपला बॅन करण्यात आले. याची माहिती स्वत: पूनम पांडेने स्वत: सोशल साइटवर आपल्या फॅन्सला दिली आहे.
तिने त्यात म्हटले आहे की, ‘गूगलने या अॅपला सस्पेंड केले आहे. मात्र एंड्रॉइड यूजर्स माझ्या poonampandey.in/download या वेबसाइटवरुन डायरेक्ट #ThePoonamPandeyApp या अॅपला डाउनलोड करु शकता.’
पूनमने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘मला वाटते की, लोकांना प्ले बॉय अॅपबाबत काहीच समस्या नाही, मात्र त्यांना या अॅपबाबत समस्या आहे, मात्र का? हे मला माहित नाही.’
‘रेजर कॉर्प आणि पूनमची एजन्सीने हे अॅप तयार केले होते. या अॅप तिच्या मनासारखे बनविण्यासाठी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
या अॅपच्या बाबतीत तिला विचारले असता, ‘हे अॅप पूर्णत: माझ्या बाबतीत आहे, जर आपण विचार करीत असाल की, मी बोल्ड आहे तर माझे हे अॅपदेखील तसेच तयार होणार आहे. अन् माझ्या इच्छेनुसार यात मला काहीही पोस्ट करण्याची पूर्णत: स्वतंत्रता आहे.’
सोबतच पूनमने या गोष्टीची माहितीदेखील दिली की, लोकं आपल्या वयाचा उल्लेख न करता या अॅपचा वापर करु शकता.