बाबो..! लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीच्या न्यूड व्हिडिओने सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 11:02 IST2020-04-13T11:01:39+5:302020-04-13T11:02:07+5:30

या अभिनेत्रीने स्वतःचा न्यूड व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

OMG! Poonam Pandey Shared Nude Video On Instagram, watch Video TJL | बाबो..! लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीच्या न्यूड व्हिडिओने सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा व्हिडिओ

बाबो..! लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीच्या न्यूड व्हिडिओने सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा व्हिडिओ

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात सर्वांनाच घरी बसून काय करावे असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री पूनम पांडेने न्यूड व बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून खळबळ माजवली आहे. 

पूनमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. पूनम पांडे ऑफिशियल ऍप वर हा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे त्याची एक झलक तिने इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. या व्हिडिओचे नाव 'FIRE STARTER' असे आहे, यामध्ये पूनम सुरुवातीला शॉट टॉप आणि नेट पॅन्ट घालून दिसते.

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो व व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो व व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल झाले आहेत. ती स्वतः सुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते.

 पूनमने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. नेहमीप्रमाणे यातील काही काही कमेंट या तिला नाव ठेवणाऱ्या तर काही तिच्या भन्नाट हॉट फिगरचे कौतुक करणाऱ्या आहेत.


पूनम पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती 'द जर्नी ऑफ कर्मा'मध्ये शक्ती कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळाला होता. तसेच तिने तेरा नशा यासारख्या चित्रपटातून सुद्धा काम केले आहे.

Web Title: OMG! Poonam Pandey Shared Nude Video On Instagram, watch Video TJL