OMG...! आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या बेबी शॉवरची तयारी करतेय ही मॉडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 18:21 IST2019-05-07T18:18:13+5:302019-05-07T18:21:54+5:30

नवऱ्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असल्याचे वृत्त स्वीकारून ही प्रसिद्ध मॉडेल तिच्या बेबी शॉवरच्या तयारीत व्यस्त आहे.

OMG ...! Mehr Jesia involved in Arjun Rampal girlfriend gabriella demetriades baby shower ceremony | OMG...! आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या बेबी शॉवरची तयारी करतेय ही मॉडेल?

OMG...! आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या बेबी शॉवरची तयारी करतेय ही मॉडेल?


बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएडस यांची चर्चा रंगली आहे. अर्जुन रामपाल लवकरच वडील बनणार आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएडससोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यात गैब्रिएलाचा बेबी बंप पहायला मिळतो आहे. गैब्रिएला डेमेट्रिएडसच्या प्रेग्नेसीच्या वृत्तानंतर आता तिच्या बेबी शॉवरची चर्चा सगळीकडे रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या बेबी शॉवरची तयारी मेहर जेसिया करणार आहे. 

टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, गैब्रिएला डेमेट्रिएडसच्या बेबी शॉवर सेरेमनी जी इव्हेंट कंपनी आयोजन करणार आहे ती मेहर जेसियाशी निगडीत आहे. ही कंपनी मेहरने आपली मित्र व मैत्रिणी आदित्य आणि कल्याणीसोबत सुरू केली होती. ही एक प्रायव्हेट सेरेमनी असून हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे येथे होणार आहे.

अद्याप अर्जुनने गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएडससोबत लग्न केलेले नाही. त्यासोबतच अर्जुन रामपाल व त्याची पत्नी मेहर जेसिया अद्याप कायदेशीररित्या विभक्त झालेले नाहीत. 


मेहर जेसियाला  गैब्रिएला डेमेट्रिएडसच्या प्रेग्नेसीबाबत अजिबात प्रॉब्लेम नाही. मेहरच्या मित्रानुसार, अर्जुनने त्याचे जीवन नव्याने जगायला सुरूवात केली असल्याचे मेहरने स्वीकारले आहे. मेहरच्या मित्राने एका वृत्त पत्राला सांगितले की, त्या दोघांचे प्रकरण पैशांमुळे रखडले आहे. ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतर ते घटस्फोट घेणार आहेत. मेहर खूप चांगली आई आहे आणि आपल्या मुलीसाठी जे योग्य आहे तेच तिला करायचे आहे.


अर्जुन आणि मेहरने २५ जुलै, २०१८ला ते दोघे वेगळे होत असल्याचे सांगितले होते.

त्या दोघांना माहिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत.

Web Title: OMG ...! Mehr Jesia involved in Arjun Rampal girlfriend gabriella demetriades baby shower ceremony