OMG!! इंटरनेटवर लिक झाला Tiger zinda hai movie...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:16 IST2017-12-22T07:20:09+5:302017-12-22T13:16:29+5:30
सलमान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ ...
.jpg)
OMG!! इंटरनेटवर लिक झाला Tiger zinda hai movie...
स मान खानच्या टायगर जिंदा है या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. एक था टायगर हा सलमान खान आणि कतरिनाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटातील अॅक्शन दृश्याची तर चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळेच एक था टायगर या चित्रपटाच्या यशानंतर टायगर जिंदा है हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला.
![Tiger Zinda Hai]()
टायगर जिंदा है या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातील अनेक गाणी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हिट झाली आहेत. सलमानचा चित्रपट म्हटला की, त्याचे फॅन्स त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याचा ट्युबलाइट हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळवता आले नाही. सलमानने अनेक वर्षांनंतर फ्लॉप चित्रपट दिल्यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. त्यामुळे टायगर जिंदा है या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटासाठी अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग देखील केले आहे. या चित्रपटाचे काही शोज तर हाऊसफुल देखील झाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. पण या चित्रपटाच्या टीमसाठी आणि सलमानच्या फॅन्ससाठी एक शॉकिंग न्यूज आहे.
टायगर जिंदा है हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही तास व्हायच्या आतच हा चित्रपट काही ऑनलाइन साइटवर लीक झाला आहे. हा संपूर्ण चित्रपट काही साइटवरून डाऊनलोड केला जात आहे.
![tiger zinda hai]()
चित्रपट ऑनलॉइन लीक होणे ही सध्या बॉलिवूडसाठी डोकेदुखीच बनली आहे. बाहुबली कन्क्ल्युजन या चित्रपटाचा मुख्य सस्पेन्सच ऑनलाइन लीक झाला होता. तसेच काही चित्रपट तर प्रदर्शनाच्याआधीच लीक होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या सगळ्याचा टायगर जिंदा हैच्या कलेक्शनवर काही परिणाम होतो का हे लवकरच आपल्याला कळेल.
Also Read : अभिषेक बच्चनच्या करियरचा ग्राफ उंचवण्यासाठी ऐश्वर्या राय घेतेय सलमान खानशी संबंधित या व्यक्तीची मदत