OMG! ​प्रभासबद्दल पसेसिव्ह झालीयं अनुष्का शेट्टी! वाचा, ताजी बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 11:55 IST2017-12-01T06:22:27+5:302017-12-01T11:55:31+5:30

‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्का शेट्टी या आॅनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे कधी नव्हे इतके उदंड प्रेम मिळाले. इतके की, आता ही ...

OMG! Anushka Shetty has been passionate about Prabhav Read, latest news !! | OMG! ​प्रभासबद्दल पसेसिव्ह झालीयं अनुष्का शेट्टी! वाचा, ताजी बातमी!!

OMG! ​प्रभासबद्दल पसेसिव्ह झालीयं अनुष्का शेट्टी! वाचा, ताजी बातमी!!

ाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्का शेट्टी या आॅनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे कधी नव्हे इतके उदंड प्रेम मिळाले. इतके की, आता ही आॅनस्क्रीन जोडी रिअल लाईफ जोडीत बदलावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. याला कारणीभूत म्हणजे ‘बाहुबली2’नंतर उठलेल्या प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का व प्रभासच्या लिंकअपच्या बातम्या येत आहेत. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगते आहे. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या कायम नाकारल्या आहेत. सध्या आम्ही कुठल्याही कमिटमेंटमध्ये नाही, हे दोघांनीही स्पष्ट केले आहे. अर्थात तरिही या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. सूत्रांचे खरे मानाल तर या लिंकअपच्या बातम्यांमध्ये आता तथ्यही दिसू लागलेय. होय, ताजी बातमीही तशीच आहे. अनुष्का म्हणे अलीकडे एका टीपिकल प्रेयसीसारखी वागू लागलीयं.  कथित बॉयफ्रेन्ड प्रभासबदद्ल ती बरीच पसेसिव्ह झालीय. प्रभासचा फोन त्याने उचलण्याआधी अनुष्का उचलू लागली आहे. विशेष म्हणजे, प्रभासला अनुष्काचा पसेसिव्हनेस खटकण्याऐवजी आवडतोयं. आता ही बातमी किती खरी आणि किती खोटी माहित नाही. पण प्रभास व अनुष्कामध्ये नक्कीच काहीतरी खिचडी पकतेय. आता प्रभाससारखा हँडसम बॉयफ्रेन्ड असल्यानंतर कुठली प्रेयसी पसेसिव्ह होणार नाही. 
प्रभास व अनुष्का भलेही आपले प्रेम मीडियापासून लपवत आहेत. पण चर्चा खरी मानाल तर दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. अलीकडे अनुष्काने प्रभासच्या त्याच्या वाढदिवसाला एक डिझाईनर घड्याळ भेट दिले होते. तर प्रभासने म्हणे अनुष्काला एक अलिशान बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती.

ALSO READ : ​-आणि तिने एक अख्खा दिवस प्रभासला आपल्या पाठीवर मिरवले...!

 अलीकडे एका ताज्या मुलाखतीत खुद्द प्रभासला अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत प्रश्न विचारला गेला होता.  हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसला होता. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर म्हणाला होता. 

Web Title: OMG! Anushka Shetty has been passionate about Prabhav Read, latest news !!