OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 12:15 IST2019-01-02T12:05:18+5:302019-01-02T12:15:46+5:30

संजय दत्त व पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘सडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीक्वलची खास बाब म्हणजे यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे.

OMG !! alia bhatt scared of working with father mahesh bhatt in film sadak 2 | OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

OMG!! ‘सडक2’ सुरू करण्यापूर्वीचं आलिया भट्टला भरली धडकी; पण का?  

ठळक मुद्दे‘सडक 2’मध्ये आलियासोबत संजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य राय कपूर अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

संजय दत्तपूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘सडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीक्वलची खास बाब म्हणजे यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. विशेष म्हणजे,‘सडक2’ अन्य कुणी नाही तर स्वत: महेश भट्ट दिग्दर्शित करणार आहेत. २० वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडले होते. पण आता तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वापसी करताहेत. आणखी खास बाब म्हणजे, या चित्रपटात ते पहिल्यांदा आपल्या मुलीला म्हणजे आलिया भट्टला डायरेक्ट करणार आहेत. पण नेमक्या याच गोष्टीमुळे आलिया जरा घाबरली आहे.



होय,  आलियाने स्वत:च ही कबुली दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आलिया बोलली. ‘सडक 2’मध्ये पापासोबत काम सुरु करण्यापूर्वी मी जरा घाबरलेली आहे. मी पापाला रोज भेटते, त्यांच्यासोबत गप्पा मारते. पण तरिही त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम म्हटल्यावर मला धडकी भरली आहे. मी स्वत:ला एका चौकटीत बंद केलेय, असे पापा मानतात. त्यांना ही चौकट मोडायचीय, असे आलियाने या मुलाखतीत सांगितले.


‘सडक 2’मध्ये आलियासोबत संजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य राय कपूर अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
१९९१ मध्ये ‘सडक’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत‘सडक 2’मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. आता ‘सडक 2’कसा रंगतो, ते बघूच. तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा.


 

Web Title: OMG !! alia bhatt scared of working with father mahesh bhatt in film sadak 2