OMG !! अभिषेक बच्चनने क्लार्क पदासाठी केला अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 10:42 IST2017-05-04T05:12:00+5:302017-05-04T10:42:49+5:30

महानायक अमिताभ बच्चन याचा मुलगा अर्थात ज्युनिअर बच्चन अभिषेक बच्चन सध्या कुठेयं? अभिषेक बच्चन सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यात व्यस्त ...

OMG !! Abhishek Bachchan's application for the post of Clark? | OMG !! अभिषेक बच्चनने क्लार्क पदासाठी केला अर्ज?

OMG !! अभिषेक बच्चनने क्लार्क पदासाठी केला अर्ज?

ानायक अमिताभ बच्चन याचा मुलगा अर्थात ज्युनिअर बच्चन अभिषेक बच्चन सध्या कुठेयं? अभिषेक बच्चन सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यात व्यस्त आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर? होय, प्रथम तुम्हाला आमच्या म्हणण्यावर विश्वास बसणार नाही. पण आमच्याकडे पुरावा आहे. काय तर, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परिक्षेत क्लार्क पदासाठी अभिषेकचा सुटाबुटातला फोटो असलेले हॉलतिकिट! आश्चर्य वाटणारच. पण हे अगदी खरे आहे. ज्युनिअर बच्चनने चक्क सरकारी नोकरीसाठी अर्ज केला आहे. त्याचे हॉलतिकीट समोर आले असून ते प्रचंड वेगाने व्हायरलही होत आहे.







ALSO READ : अभिषेक बच्चन होणार ‘अरेस्ट’!!

अभिषेक बच्चन सारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या मुलाला कशाला हवी सरकारी नोकरी, असे तुम्हाला हे वाटेल. तुमचे म्हणणे चुकीचे नाहीच.   खरे तर हे सरकारी गलथानपणाचे उदाहरण आहे. आता सगळे प्रकरण काय, हे आम्ही तुम्हाला सांगतो. त्याचे झाले असे की, स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे  मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ या पदासाठी अलीकडे परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका हॉलतिकीटावर चक्क अभिषेक बच्चनचा फोटो  आहे. हॉल तिकिटाचा रोल नंबर आहे, 2405283611 असा.  1 जानेवारी 1995  अशी जन्मतारिख त्यावर नोंदवली गेली आहे. फोटोखाली असलेल्या सहीमध्ये अभिशेखर बच्चन अशी सही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कार्डावर अभिषेकचा उल्लेख  महिला असा करण्यात आला आहे. तसेच तो लातूरचा रहिवाशी असल्याचेही दाखवण्यात आले आहे. आता हे हॉलतिकीट बोगस आहे, हे सांगणे नकोच. आपल्या देशात असे धक्के अधूनमधून आपल्याला बसत असतातच.

Web Title: OMG !! Abhishek Bachchan's application for the post of Clark?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.