‘OMG 2’ आता येणार ओटीटीवर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 06:07 PM2023-10-04T18:07:32+5:302023-10-04T18:25:24+5:30

‘OMG 2’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'OMG 2' will now come on OTT! Find out when and where to watch movies | ‘OMG 2’ आता येणार ओटीटीवर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

Akshay Kumar

googlenewsNext

अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘OMG 2’ ने सगळीकडेच धमाका केला आहे. शिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘OMG 2’ च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा रंगली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ‘OMG 2’  हा चित्रपट 8 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत नेटफ्लिक्सने एक पोस्ट शेअर केली आहे. 

 ‘OMG 2’ चित्रपटातून सेक्स एज्युकेशनसारखा मुद्दा मांडण्यात आला आहे. या चित्रपटाला  प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली. तर पंकज त्रिपाठी या चित्रपटात भगवान शंकराचा निस्सीम भक्त असलेल्या कांती शरण मुग्दल या सामान्य आणि प्रामाणिक व्यक्तीच्या भूमिकेत पाहायला मिळाले. तर अभिनेत्री यामी गौतमने वकील कामिनी महेश्वरीची भूमिका साकारली.

'OMG 2' हा 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'OMG' चित्रपटाचा सिक्वेल आहे. OMG चित्रपटात परेश रावल यांनी नास्तिकाची भूमिका साकारली होती, तर अभिनेता अक्षय कुमार भगवान कृष्ण बनला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.  दरम्यान अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच 'मिशन राणीगंज' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'OMG 2' will now come on OTT! Find out when and where to watch movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.