​ ओम पुरींच्या नावाने भलतीच व्यक्ती चालवत होती twitter अकाऊंट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 12:53 PM2017-01-16T12:53:55+5:302017-01-16T12:57:44+5:30

ओम पुरी यांच्या मृत्यूूूूबद्दलचे गूढ अद्यापही कायम आहे. अभिनेते ओम पुरी यांचे ६ जानेवारी २०१७ ला निधन झाले होते. ...

Om Puri's name was running in the name of twitter account !! | ​ ओम पुरींच्या नावाने भलतीच व्यक्ती चालवत होती twitter अकाऊंट!!

​ ओम पुरींच्या नावाने भलतीच व्यक्ती चालवत होती twitter अकाऊंट!!

googlenewsNext
पुरी यांच्या मृत्यूूूूबद्दलचे गूढ अद्यापही कायम आहे. अभिनेते ओम पुरी यांचे ६ जानेवारी २०१७ ला निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूला आज पाच दिवस झाले, पण पोलिसांना अजून त्यांच्या मृत्यूमागचे रहस्य शोधता आलेले नाही. यातच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटबाबत एक नवा खुलासा ऐकायला मिळतोय. त्यांच्या पत्नी नंदिता पुरी व मुलगा इशान यांनी हा खुलासा केला आहे. ओम पुरी  twitterवर नव्हते. त्यांच्या नावाने दुसरीच कुणी व्यक्ति त्यांचे  twitter अकाऊंट चालवत होते, असा दावा नंदिता व इशान यांनी केला आहे. 



ओम पुरी यांचे चाहते आणि जगभरात त्यांना ओळखणारे लोक त्यांचे बनावट  twitterप्रोफाईल टॅग करत आहेत. मी ओम पुरी यांच्या चाहत्यांना सांगू इच्छिते की, त्यांचे कुठलेही  twitter अकाऊंट नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळखणा-या अनेकांनी आणि विदेशी मीडियाने ओम राजेश पुरी  नावाच्या एका प्रोफाईलवरून माहिती घेतली. पण हे पुरी यांचे अकाऊंट नव्हते, असे नंदिता यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांचा मुलगा इशान यानेही वडिलांच्या बनावट अकाऊंटबाबत माहिती दिली आहे. माझे वडील कधीच  twitterवर नव्हते आणि मी सुद्धा  twitterवर नाहीय. कुणीतरी भलतीच व्यक्ति त्यांच्या नावाने सामग्री पोस्ट करतेय. माझ्या मित्रांनी मला माझ्या वडिलांच्या  twitterअकाऊंटबद्दल विचारले. तेव्हा कुठे मला याबद्दल कळले, असे इशानने स्पष्ट केले आहे.

ओम पुरींच्या शवविच्छेदन अहवालानुसार, ओमपुरी यांच्या डोक्याला  दिड इंच खोल आणि ४ सेमी लांब इतकी जखम झाल्याचे आणि मानेचे हाड तसेच डाव्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले होते. ओम पुरी यांचे शुक्रवारी ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे. ओम पुरी यांचा मृत्यु अनैसर्गिकपणे झाल्याच्या संशयामुळे त्यांच्या नातेवाईकांची आणि शेजा-यांची पोलिस चौकशी करत आहे.  

Web Title: Om Puri's name was running in the name of twitter account !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.