अरे बापरे...! सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देणारी स्वरा भास्कर आता करणार मारधाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:03 IST2019-01-30T18:55:46+5:302019-01-30T19:03:47+5:30

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

Oh my God! Swara Bhaskar, who gives a brief reply on social media, now doing fighting | अरे बापरे...! सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देणारी स्वरा भास्कर आता करणार मारधाड

अरे बापरे...! सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देणारी स्वरा भास्कर आता करणार मारधाड

ठळक मुद्देस्वरा भास्कर पोलिस अधिकाऱ्याची साकारणार भूमिका 'फ्लेश' ही मालिका भारतातील मानव तस्करीच्या विषयावर आधारित


बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आणि आजही तिच्या भूमिकेबद्दल बोलले जाते. स्वरा भास्कर बऱ्याचदा रोखठोक भूमिकेमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे मारामारी... होय हे खरे आहे. स्वरा सध्या मारामारीचे प्रशिक्षण घेते आहे. हे प्रशिक्षण ती कुणाला मारण्यासाठी नाही तर आगामी वेबसीरिज फ्लेश साठी घेत आहे. 

स्वरा भास्कर 'फ्लेश' या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. यात तिला भरपूर अॅक्शन करावी लागणार आहे. यासाठी ती अॅक्शन वर्कशॉपमध्ये सहभागी झाली आहे. 'फ्लेश' ही मालिका भारतातील मानव तस्करीच्या विषयावर आधारित आहे.'फ्लेश'मध्ये मानवी तस्करी थांबवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तीरेखा स्वराची आहे. याबाबत स्वरा म्हणाली, "याची कथा रोमांचक आणि भीतीदायक आहे. आपल्या समाजातील खऱ्या हिरोंची आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची ही कथा आहे. पोलिसांसमोरील आव्हाने, त्यांच्या मर्यादा आणि कोणत्या स्थितीत ते काम करतात याबद्दल त्यांना समजून घेण्याचा अनुभव घेत आहे."


अॅक्शन दृष्यांबद्दल बोलताना स्वरा म्हणाली, "मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अॅक्शन करीत असून त्यामुळे थोडी नर्व्हस आहे. मी हबीब - रिजवान ( अॅक्शन दिग्दर्शक ) यांच्यासोबत प्राथमिक  प्रशिक्षण घेतले आहे."

Web Title: Oh my God! Swara Bhaskar, who gives a brief reply on social media, now doing fighting