अक्सर 2 च्या शूटिंगसाठी जरीन खानने बाजूला ठेवली आपली भिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 17:50 IST2017-09-11T12:20:34+5:302017-09-11T17:50:34+5:30
अभिनेत्री जरीन खान आपला आगामी चित्रपट अक्सर-2 मधून प्रेक्षकांना धक्का द्यायला तयार झाली आहे. जरीन नेहमीच काही तरी वेगळे ...
अक्सर 2 च्या शूटिंगसाठी जरीन खानने बाजूला ठेवली आपली भिती
अ िनेत्री जरीन खान आपला आगामी चित्रपट अक्सर-2 मधून प्रेक्षकांना धक्का द्यायला तयार झाली आहे. जरीन नेहमीच काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. जरीनाला खानात ऐडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे मात्र तिला समुद्राच्या पाण्याचा फोबिया आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जरीनाला असलेल्या या फोबियाला थैलासोफोबिज म्हणतात. थैलासोफोबिजमध्ये काही लोकांना समुद्राच्या पाण्याची भिती वाटते काहींना त्यांच्या विशालतेची तर काही समुद्रात असलेल्या जलचर प्राण्यांची.
जरीनने याआधी आपल्या समुद्राच्या पाण्याबाबत असलेल्या फोबियाबद्दल कधीच बोलला नव्हती. मात्र अक्सर 2 च्या शूटिंग दरम्यान आपल्या या फोबियाचा सामना करण्याचा निर्णय तिने घेतला. चित्रपट अक्सर-2 मध्ये असलेल्या अंडरवॉटर सीन्सची शूटिंग मॉरिशयमध्ये करण्यात आली. मॉरिशयमध्ये शूटिंग दरम्यान आपल्या मानतल्या पाण्याच्या भितीला बाजूला ठेवत सगळे अंडरवॉटर सीन्स शूट केले. जरीनच्या या वागण्यामुळे चित्रपटाची टीम आणि तिचे सह-कलाकार आश्चर्यचकित झाले. जरीन म्हणाली की, समुद्राच्या पाण्याबरोबर त्यात असणाऱ्या प्राण्यांची तिला भिती वाटते. अक्सर 2 च्या शूटिंग दरम्यान अंडरवॉटर सीन्स शूट करताना ती खूप घाबरली होती. जेव्हा मी अनवाणी पायाने समुद्रात गेली तेव्हा काही प्राण्यांना मी हात लावला आणि हा अनुभव माझ्यासाठी सगळ्यात भितीदायक होता. मात्र मला आनंद आहे की मी शूटिंग पूर्ण केले.
यात जरीनसह गौतम रोडे आणि अभिनव शुक्ला यांच्या ही यात महत्वाच्या भूमिका आहेत. हा एक अक्शन थ्रीलर चित्रपट आहे. नरेंद्र बजाज आणि चिराग बजाज याचित्रपटाची निर्मिती करतायेत. तर अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाला संगीत मिथुनचे आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.