कधीकाळी अशी दिसायची जुही चावला, फोटो शेअर करून सांगितली आपबिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:58 IST2018-03-28T13:20:52+5:302018-03-28T18:58:51+5:30
ही बाब तेवढीच खरी आहे की, वाढत्या वयानुसार आपल्या चेहºयात आणि शरीरात बरेचसे बदल होत असतात. मात्र कधी-कधी स्वत:च्या ...

कधीकाळी अशी दिसायची जुही चावला, फोटो शेअर करून सांगितली आपबिती!
जुहीने शेअर केलेल्या फोटोवर नजर टाकल्यास तिच्या चेहºयात एकदमच बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या जुहीचे वय ५० वर्षे इतके आहे. तिने बॉलिवूडसह साउथ आणि काही वेब सिरीजमध्येही काम केले आहे. ती आगामी ‘झिरो’ या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. काही काळापूर्वी जुही ‘गुलाब गॅँग’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसली होती. या भूमिकेबद्दल तिने सांगितले होते की, या चित्रपटानंतर मला कळून चुकले की, मी एक चांगली खलनायक आहे. वास्तविक ‘गुलाब गॅँग’नंतर आतापर्यंत तिला असा एकही रोल आॅफर करण्यात आला नाही.
दरम्यान, जुहीने ‘कयामत से कयामत तक, स्वर्ग, शानदार, बोल राधा बोल, इज्जत की रोटी, अंदाज, साजन का घर, हम है राही प्यार के, फिर भी दिल है हिंदुस्तानी, भूतनाथ’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुही अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय असून, आगामी काळात तिची अदाकारी असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.