नुसरत जहाँच्या फोटोवर चाहत्यांनी केला प्रश्नांचा भडीमारा, तिच्या गॉगलमध्ये दिसली त्या स्पेशल व्यक्तीची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:11 IST2021-07-01T17:11:02+5:302021-07-01T17:11:27+5:30

बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ सध्या खूप चर्चेत आहे.

Nusrat Jahan's photo was bombarded with questions from fans, a glimpse of the special person seen in her Google | नुसरत जहाँच्या फोटोवर चाहत्यांनी केला प्रश्नांचा भडीमारा, तिच्या गॉगलमध्ये दिसली त्या स्पेशल व्यक्तीची झलक

नुसरत जहाँच्या फोटोवर चाहत्यांनी केला प्रश्नांचा भडीमारा, तिच्या गॉगलमध्ये दिसली त्या स्पेशल व्यक्तीची झलक

बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ सध्या खूप चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे, निखील जैनसोबतचे तिचे लग्न मोडल्याची चर्चा आहे. दुसरे म्हणजे, नुसरत प्रेग्नंट आहे आणि तिसरे कारण काय तर प्रेग्नंट नुसरतच्या अफेअरच्या चर्चाही ऐकायला मिळते आहे. नुसरत जगाची पर्वा न करता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. नुकतेच तिच्या चाहत्यांनी असे काहीतरी पाहिले ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतीच नुसरत जहाँने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतने पांढरा टीशर्ट घातला आहे. ज्यामध्ये ती बेबी-बंप लपवण्याचा प्रयत्न करत असताना दिसते आहे.

नुसरतने या फोटोंमध्ये सनग्लास घातला आहे आणि एक व्यक्ती या मोठ्या सनग्लासेसमध्ये फोटो काढताना रिफ्लेक्ट होताना दिसत आहे.

हे फोटो शेअर केल्यावर नुसरत जहाँच्या चाहत्यांनी ही फोटो काढणारी व्यक्ती म्हणजेच तिचा कथित बॉयफ्रेंड यश शिवाय इतर कोणी नाही असा तर्कवितर्क लावायला सुरूवात केली. काही वेळातच नुसरतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. तर, दुसरीकडे चाहत्यांनी या पोस्टवर प्रश्नांचा भडीमारा केला.


नुसरत आणि निखिलच्या लग्नाचा १९ जून रोजी दुसरा वाढदिवस होता. मात्र, हे दोघे लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवशी वर्षी एकत्र नव्हते. १९ जून २०१९ रोजी त्या दोघांनी तुर्कीच्या बोड्रम सिटीमध्ये लग्नबेडीत अडकले होते. दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजात पार पडले होते. कोलकातामधील आयटीसी रॉयल हॉटेलमध्ये नुसरत आणि निखिल यांचे लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आयोजित केले होते. या सोहळ्यात राजकारण आणि चित्रपट जगातातील, इतर क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होते.


आता नुसरत गर्भवती आहे आणि तिचा नवरा निखिल जैनने हे मूल आपले नसल्याचे म्हटले आहे. तसेच ते दोघे बर्‍याच दिवसांपासून वेगळे राहत आहेत. दुसरीकडे, नुसरतने तिच्या लग्नाला लिव्ह-इन रिलेशनशिप राहत असल्याचे म्हटले आहे. अशी चर्चा देखील सुरु आहे की, सध्या नुसरत बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Web Title: Nusrat Jahan's photo was bombarded with questions from fans, a glimpse of the special person seen in her Google