आता ‘या’ ठिकाणी बघावयास मिळाली शाहरूख खानची लाडकी सुहाना!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:57 IST2017-10-31T10:27:32+5:302017-10-31T15:57:32+5:30

गेल्या काही काळापासून बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लाडकी सुहाना खान जास्तच प्रसिद्धीझोतात राहत आहे. कधी आपल्या मेकओव्हरमुळे तर कधी ...

Now Shah Rukh Khan's sweetheart got to see this place. | आता ‘या’ ठिकाणी बघावयास मिळाली शाहरूख खानची लाडकी सुहाना!!

आता ‘या’ ठिकाणी बघावयास मिळाली शाहरूख खानची लाडकी सुहाना!!

ल्या काही काळापासून बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लाडकी सुहाना खान जास्तच प्रसिद्धीझोतात राहत आहे. कधी आपल्या मेकओव्हरमुळे तर कधी हॉट ड्रेसमुळे सुहाना लोकांचे स्वत:कडे लक्ष केंद्रित करीत आहे. त्यामुळे सुहाना सध्या स्टार किड्समध्ये सर्वांत जास्त चर्चेत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. असो, सध्या सुहानाबद्दल रंगणारी चर्चा लक्षात घेता लवकरच ती बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे. आता तर सुहानाला एका आॅडिशन स्टुडिओच्या बाहेर बघण्यात आल्याने तिच्या डेब्यूवरून जोरदार चर्चा रंगली आहे. 

आतापर्यंत सुहाना सेलेब्रिटीज पार्ट्यांमध्ये बघावयास मिळाली. त्याचबरोबर मित्रांबरोबरही ती बºयाचदा स्पॉट झाली. त्यातच आता ती आॅडिशन स्टुडिओच्या बाहेर बघावयास मिळाल्याने, सुहाना तिच्या डेब्यूची तर तयारी करीत नसावी ना? या चर्चेला आता उधान आले आहे. डेक्कन क्रॉनिकल रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, ‘सुहाना आॅडिशन द्यायला गेली होती का, बघण्यासाठी गेली होती हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु शाहरूखची लेक सध्या अभिनयाचे धडे घेत असल्याचे निश्चितपणे म्हणता येईल. 



काही दिवसांपूर्वी सुहाना मम्मी गौरी खानसोबत एका पार्टीमध्ये स्पॉट झाली होती. गोल्डन रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती. जेव्हा सुहानाने पार्टीत एंट्री केली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर स्थिरावल्या होत्या. कारण सुहानाचा लूक बघण्यासारखा होता. असो, सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूविषयी सांगायचे झाल्यास, सध्या ती शिक्षण घेत असल्याने तिने इतक्यात अभिनयाचा विचार करू नये अशी पप्पा शाहरूखची इच्छा आहे. परंतु सुहानाचे एकूण इंडस्ट्रीमधील वावर पाहता ती पुढच्या काही वर्षांत इंडस्ट्रीत पाऊल ठेवेल यात शंका नाही. 

Web Title: Now Shah Rukh Khan's sweetheart got to see this place.