​आता अशी दिसते बॉर्डरमधील ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 12:11 IST2018-01-24T06:41:28+5:302018-01-24T12:11:28+5:30

बॉर्डर या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील ...

Now it looks like the actress in Border | ​आता अशी दिसते बॉर्डरमधील ही अभिनेत्री

​आता अशी दिसते बॉर्डरमधील ही अभिनेत्री

र्डर या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटातील सगळी गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाची कथा ही प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, तब्बू, पूजा भट्ट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात ए जाते हुए लम्हो जरा ठहरो... या गाण्यात आपल्याला सुनील शेट्टीसोबत शरबानी मुखर्जी नावाची एक अभिनेत्री पाहायला मिळाली होती. शरबानी या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटात झळकलीच नाही. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. तिने त्यानंतर अनेक दाक्षिणात्य आणि भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले. 

sharbani mukherjee

शरबानी बॉर्डरमधील केवळ एकाच गाण्यात असली तरी तिच्या सौंदर्याची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. शरबानी ही बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध घराण्याशी संबंधित आहे. बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची ती बहीण आहे. काजोल आणि राणी मुखर्जी यांची ती चुलत बहीण आहे. शरबानीच्या वडिलांचे नाव रोनो मुखर्जी आहेत. रोनो हे देब मुखर्जी, जॉय मुखर्जी आणि शोमू मुखर्जींचे भाऊ आहेत. हे मुखर्जी कुटुंब अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.
शरबानी कशी दिसते याची उत्सुकता आज अनेकांना आहे. अनेक वेळा ती काजोलसोबत दुर्गा पूजेला हजेरी लावते. पण ती खूप बदललेली असल्याने तिला ओळखणे कठीण जाते. शरबानी गेल्या २० वर्षांत खूप बदलली आहे. आता ती खूपच वेगळी दिसते. तिचे आजचे फोटो पाहिले तर हीच ती शरबानी आहे का असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल. शरबानी आज देखील काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते. 
सरबानीचा सख्खा भाऊ सम्राट मुखर्जी हा बंगाल चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने काही बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे. शरबानीचे संपूर्ण कुटुंब बॉलिवूडशीच संबंधित आहे.  

Also Read : बॉर्डर या चित्रपटातील धर्मवीर या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हे तर या अभिनेत्याची करण्यात आली होती निवड

Web Title: Now it looks like the actress in Border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.