शाहरुखचा 'ओम शांती ओम' नाही तर दीपिका पादुकोणचा हा होता पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 09:25 AM2024-01-06T09:25:31+5:302024-01-06T09:26:03+5:30

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या १८ वर्षांपासून ती कलाविश्वात सक्रिय आहे.

Not Shahrukh Khan's 'Om Shanti Om' but Deepika Padukone's first film, has a special connection with 'Aishwarya' | शाहरुखचा 'ओम शांती ओम' नाही तर दीपिका पादुकोणचा हा होता पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन

शाहरुखचा 'ओम शांती ओम' नाही तर दीपिका पादुकोणचा हा होता पहिला सिनेमा, 'ऐश्वर्या'शी आहे खास कनेक्शन

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या १८ वर्षांपासून ती कलाविश्वात सक्रिय आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच दीपिकाने तिचा वाढदिवस साजरा केला. दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिचा हा पहिला चित्रपट नव्हता. 

दीपिका पादुकोणनेशाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिची किंग खानसोबतची जोडी लोकप्रिय ठरली होती. ९ नोव्हेंबर २००७ रोजी रिलीज झालेला 'ओम शांती ओम' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, त्यानंतर दीपिका पदुकोण रातोरात सुपरस्टार बनली. 'ओम शांती ओम' हा दीपिका पदुकोणचा पहिला चित्रपट असल्याचं म्हटलं जातं, पण तसं नाही. वास्तविक, तिने अभिनयाच्या जगात एका साऊथ चित्रपटातून प्रवेश केला होता.

या चित्रपटातून दीपिकाने करिअरला केली सुरुवात
'ओम शांती ओम'च्या फक्त एक वर्ष आधी म्हणजेच २००६ मध्ये दीपिका पादुकोण कन्नड चित्रपट 'ऐश्वर्या'मध्ये दिसली होती. यामध्ये अभिनेत्रीने दाक्षिणात्य अभिनेता उपेंद्रसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाचे शीर्षक बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्याच्या नावावरून आले आहे. दीपिकाने 'ऐश्वर्या' चित्रपटात ऐश्वर्या नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले, पण तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. यानंतर दीपिका बॉलिवूडकडे वळली.

वर्कफ्रंट
२०२३ मध्ये दीपिका पादुकोण 'पठाण' आणि नंतर 'जवान'मध्ये दिसली होती. 'पठाण'मध्ये तिची चांगली भूमिका होती. तर दीपिकाने 'जवान'मध्ये कॅमिओ केला होता. आता दीपिका पदुकोण लवकरच 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहे, जो या महिन्यात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यानंतर दीपिका साऊथ चित्रपट 'कल्की 2898' AD मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Not Shahrukh Khan's 'Om Shanti Om' but Deepika Padukone's first film, has a special connection with 'Aishwarya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.