'RRR', 'KGF' नाही तर 'हा' सिनेमा सर्वाधिक लोकांनी केलाय सर्च, गुगलची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 19:03 IST2022-12-07T19:01:50+5:302022-12-07T19:03:10+5:30
केजीएफ २ दुसऱ्या क्रमांकावर आहे तर द काश्मीर फाइल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे

'RRR', 'KGF' नाही तर 'हा' सिनेमा सर्वाधिक लोकांनी केलाय सर्च, गुगलची माहिती
२०२२ हे वर्षं आता संपायला आले आहे आणि सोशल मीडियावर यावर्षी सर्वात जास्त चर्चेत असलेल्या चित्रपट आणि वेबसीरिजची चर्चा होताना दिसते आहे. नुकतेच याबाबत गुगलने खुलासा केला आहे. २०२२ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटाबद्दल गुगलने माहिती दिली आहे. गुगलने दिलेली माहिती पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. कारण गुगलच्या माहितीनुसार यामध्ये दाक्षिणात्य नव्हे तर बॉलिवूड चित्रपटाचा समावेश आहे.
गुगलच्या म्हणण्यानुसार, रणबीर कपूर आणि आलिया भटचा ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला आहे. बॉयकॉट ट्रेंड जोरात असतानासुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘ब्रह्मास्त्र’ने याबाबतीत मोठमोठ्या साउथच्या चित्रपटांना मात दिल्याने बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
साउथच्या आरआरआर, केजीएफ २सारख्या चित्रपटांना मागे टाकत ब्रह्मास्त्रने ही बाजी मारली आहे. ब्रह्मास्त्र पहिल्या क्रमांकावर आहे तर केजीएफ २ हा दुसऱ्या स्थानवर आहे तर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा पाचव्या क्रमांकावर आहे.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४०० कोटींची कमाई केली होती. बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसूनसुद्धा या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.