'महिलाच नव्हे तर...', मराठमोळ्या या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 07:00 IST2021-08-12T07:00:00+5:302021-08-12T07:00:00+5:30

सिनेइंडस्ट्रीच्या काळ्या बाजूबद्दल अनेक कलाकारांनी विशेष करून अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

'Not only women but ...', the Marathi actress made a shocking revelation | 'महिलाच नव्हे तर...', मराठमोळ्या या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

'महिलाच नव्हे तर...', मराठमोळ्या या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

सिनेइंडस्ट्रीच्या काळ्या बाजूबद्दल अनेक कलाकारांनी विशेष करून अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूड आणि मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिनेदेखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये याबाबत सांगितले होते.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये बोलताना राधिका आपटे म्हणाली, इथे कोणीच सुरक्षित नाही आहे. हे स्थान सर्वांसाठीच धोकादायक आहे. कारण इथे केवळ महिलाच नाही तर पुरुष कलाकारांचही लैंगिक शोषण केले जाते.


एका इंग्रजी वृत्तानुसार, राधिका आपटे म्हणाली, सिनेइंडस्ट्रीमध्ये शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या काही अभिनेत्यांची नावेही मला माहिती आहेत. ही लोक समोर यासाठी येत नाहीत कारण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही.


राधिका पुढे म्हणाली, कामाच्या ठिकाणी असे अत्याचार होऊ नये यासाठी लैंगिक हिंसा प्रतिबंधक समिती असणे गरजेचे आहे. जर कोणावर अत्याचार होत असेल तर अशा स्त्री किंवा पुरुषाने आवाज उठवणे गरजेचे आहे.


राधिका आपटे शेवटची ओके कंप्यूटर या वेबसीरिजमध्ये झळकली आहे.तसेच तिने 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले होते. याशिवाय राधिका घोल या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.

Web Title: 'Not only women but ...', the Marathi actress made a shocking revelation