तैमूर, मीशा, अबरामच नव्हे तर मल्लिका शेरावतचा भाचाही आहे खूपच क्यूट, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 19:18 IST2017-11-04T13:44:43+5:302017-11-04T19:18:36+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला असून, आता या यादीत आणखी एका चिमुकल्याचे नाव जोडले गेले आहे. वाचा सविस्तर!

Not only Timur, Meisha, Abram, Mallika Sherawat's grandfather is also very cute, see photos! | तैमूर, मीशा, अबरामच नव्हे तर मल्लिका शेरावतचा भाचाही आहे खूपच क्यूट, पहा फोटो!

तैमूर, मीशा, अबरामच नव्हे तर मल्लिका शेरावतचा भाचाही आहे खूपच क्यूट, पहा फोटो!

्या बॉलिवूड सेलिब्रिटीजपेक्षा स्टार किड्सला लोक अधिक पसंत करीत आहेत. सोशल मीडियावर तर या स्टारकिड्सचाच बोलबाला आहे. कारण यांचा कुठलाही फोटो समोर आला की, सोशल मीडियावर तो वाºयासारखा व्हायरल होतो. या सर्व स्टार किड्समध्ये सर्वात पहिले नाव येते ते करिना कपूरच्या लाडक्या तैमूरचे, दुसºया क्रमांकावर शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची लाडकी मीशा अन् तिसºया क्रमांकावर शाहरूख खानचा लाडका अबराम हे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले स्टारकिड्स आहेत. मात्र आता या यादीत आणखी एका चिमुकल्याचे नाव जुळले गेले आहे. होय, हा चिमुकला दुसरातिसरा कोणीही नसून मल्लिका शेरावतचा भाचा आहे. 



गेल्या काही दिवसांपासून मल्लिकाच्या भाच्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या आपल्या भाच्याचे अनेक फोटोज् मल्लिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चिमुकल्याविषयी चांगलीच चर्चा रंगत  आहे. 



मल्लिकाने तिच्या भाच्याचे जेवढे फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले, त्या सर्व फोटोंना तिच्या चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स आणि कॉमेण्ट मिळत आहेत. आपल्या भाच्याचे फोटो शेअर करताना मल्लिकाने म्हटले की, ‘ही माझी पहिली हॅलोवीन पार्टी आहे. 



जर तुम्ही मल्लिकाचे सोशल मीडिया अकाउंट बिघतले तर तुमच्या लक्षात येईल की, तिने तिच्या लाडक्या भाच्याचे किती फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती भाच्यासोबत मस्ती करताना बघावयास मिळते तर काही फोटोंमध्ये ती त्याचे लाड करताना दिसत आहे. 



नेटिझन्स तर मल्लिकाच्या भाच्याची तुलना थेट करिना कपूरच्या लाडक्या तैमूरशी करीत आहेत. असो मल्लिकाच्या भाच्याचे नाव रॅन्शे असे आहे. मल्लिका गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. सध्या ती विदेशात तिच्या बॉयफ्रेंडचा बिझनेस सांभाळत असल्याचे समजते. 
 

 

Web Title: Not only Timur, Meisha, Abram, Mallika Sherawat's grandfather is also very cute, see photos!