OMG ! आलिया भट नव्हेच तर सारा अली खानला देखील करायचे आहे रणबीर कपूरसोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 13:25 IST2020-05-30T13:25:26+5:302020-05-30T13:25:33+5:30

करण जोहरच्या चॅट शोदरम्यान तिने ही इच्छा व्यक्त केली.

Not only alia bhatt but this actress too wishes to marry ranbir kapoor gda | OMG ! आलिया भट नव्हेच तर सारा अली खानला देखील करायचे आहे रणबीर कपूरसोबत लग्न

OMG ! आलिया भट नव्हेच तर सारा अली खानला देखील करायचे आहे रणबीर कपूरसोबत लग्न

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या मागे तरुणी क्रेझी आहे. आलिया भटने बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीने रणबीर कपूरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल आहे. करण जोहरच्या चॅट शोदरम्यान तिने ही  इच्छा व्यक्त केली होती. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सारा अली खान आहे. साराने करणच्या शोमध्ये ही इच्छा व्यक्त केली होती.

सारा अली खान वडील सैफ अली खान यांच्यासोबत याशोमध्ये आली होती. जेव्हा साराला विचारण्यात आले की, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन यांच्यात तिला एकाची लग्नासाठी निवड करायची असेल तर तो कोण असेल? साराने रणबीरच्या नावावर मोहर लावली होती. तर डेटवर जाण्यासाठी साराने कार्तिकचे नाव घेतले होते. 

सारा आणि कार्तिक यांनी काहीकाळ एकमेंकाना डेट केले आहे. मात्र काही कारणामुळे दोघांचे रिलेशनशीप दीर्घकाळ चालेल नाही. सध्या रणबीर कपूर आलिया भटला डेट करतो आहे. दोघांच्या कुटुंबीयांनीही या नात्याला मंजुरी दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनादरम्यान आलिया खंबीरपणे संपूर्ण कुटुंबीयांसोबत उभी दिसली. 

Web Title: Not only alia bhatt but this actress too wishes to marry ranbir kapoor gda