कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:27 PM2024-06-13T13:27:59+5:302024-06-13T13:42:37+5:30

माहिती तुम्हाला आहे का? बॉलिवूडमध्ये एक अशी जोडी आहे, ज्याची संपत्ती ही कितीतरी जास्त आहे.

Not Kapoor or Bachchan, 'Shahrukh Khan Gauri Khan Richest Bollywood Couple Net Worth 8096 Crore Rupees Mannat Mumbai | कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

कपूर किंवा बच्चन नाही, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पॉवर कपल, संपत्ती पाहून नक्कीच उंचावतील भुवया!

Bollywood richest Couple :  बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय जोडपी आहेत. ज्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. अभिनेत्री आलिया भट- रणबीर कपूर  (Alia Bhatt-Ranbir Kapoor), अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान (Shah rukh khan-Gauri Khan), दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone-Ranveer Singh), सैफ अली खान आणि करीना कपूर (Saif Ali Khan-Kareena kapoor) या बॉलिवूड जोड्या तोडीस तोड टक्कर देताना दिसतात. या जोड्यांची कमाई मोठी असून आर्थिकदृष्या मजबूत आहेत. पण, यांच्यात सर्वात श्रीमंत जोडी कोणती? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? एक अशी जोडी आहे, ज्याची संपत्ती ही कितीतरी जास्त आहे.

किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडपं आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांना आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत. GQच्या रिपोर्टनुसार, शाहरुख आणि गौरी यांची एकूण संपत्ती 8096 कोटी रुपये आहे.

लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, शाहरुखची गणना जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये केली जाते.  शाहरुख आणि गौरी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. निर्माती असण्यासोबतच गौरी खान एक यशस्वी आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी इंटिरियर डिझायनर आहे. तिचा Gauri Khan Designs  नावाचा डिझाईन स्टुडिओ आहे. शाहरुख आणि गौरीच्या मुंबईतील 'मन्नत' या प्रतिष्ठित घराची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे.

GQ नुसार, बॉलिवूडमधील दुसरं सर्वात श्रीमंत जोडपं हे राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा हे आहे. राणी आणि आदित्य यांची एकूण संपत्ती सुमारे 7400 कोटी रुपये आहे. आदित्य चोप्रा हा YRF चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. यासोबतच अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांची एकूण संपत्ती 4900 कोटी रुपये आहे.

इतर बॉलिवूड जोड्यांबद्दल बोलायचं झालं तर खिलाडी कुमार अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांची एकूण संपत्ती 3542 कोटी रुपये आहे. तर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची एकूण संपत्ती 2994 कोटी रुपये आहे. GQ नुसार, सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची एकूण संपत्ती 1968 कोटी रुपये आहे. तर आलिया आणि रणबीरची एकूण संपत्ती ही 885 कोटी आहे. 

Web Title: Not Kapoor or Bachchan, 'Shahrukh Khan Gauri Khan Richest Bollywood Couple Net Worth 8096 Crore Rupees Mannat Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.