Nora Farehi चा डान्स रिहर्सलचा व्हिडीओ घालतोय धुमाकूळ, एकदा बघाल बघतच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:29 PM2022-01-14T14:29:24+5:302022-01-14T14:33:20+5:30

Nora Fatehi Dance Video : आता पुन्हा एकदा तिचा एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. डान्स रिहर्सलच्या या व्हिडीओत नोरा ब्रा आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

Nora Farehi dance wearing a sports bra video goes viral | Nora Farehi चा डान्स रिहर्सलचा व्हिडीओ घालतोय धुमाकूळ, एकदा बघाल बघतच रहाल!

Nora Farehi चा डान्स रिहर्सलचा व्हिडीओ घालतोय धुमाकूळ, एकदा बघाल बघतच रहाल!

googlenewsNext

बॉलिवूडची जबरदस्त डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ची तरूणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. ती नेहमीच तिच्या फॅन्ससाठी हॉट फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिचा एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. डान्स रिहर्सलच्या या व्हिडीओत नोरा ब्रा आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

या व्हिडीओत नोरा एका दुसऱ्या डान्सरसोबत डान्स स्टेप्सची रिहर्सल करताना दिसत आहे. तिची प्रत्येक मुव्ह इतकी शार्प आणि करेक्ट आहे की, फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. पुन्हा एकदा तिच्या डान्सने तिचे फॅन्स भारावून गेले आहेत. 

काही दिवसांपूर्वी नोराने खुलासा केला होता की, १६ ते १८ वर्षापर्यंत तिला एक वेट्रेस म्हणून काम करावं लागलं होतं. ती म्हणाली होती की, एक वेट्रेस बननं फार अवघड आहे. तुमच्याकडे व्यक्तीत्व असलं पाहिजे. तुम्ही शार्प असायला हवं. तुमची स्मरणशक्ती चांगली असायला हवी. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता तुमच्याकडे हवी'. 

नोरा फतेही नुकती गुरू गंधावाचा म्युझिक व्हिडीओ 'डान्स मेरी राणी'मध्ये दिसली होती. यातील दोघांची केमिस्ट्री फॅन्सना खूप आवडली होती. यात ती एका जलपरीच्या रूपातही दिसली होती. सोबतच गुरू रंधावासोबत तिचं अफेअर सुरू असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. पण दोघांनीही यावर काहीच अधिकृतपणे सांगितलेलं नाही.

हे पण वाचा :

Titanic आजवर समुद्रातून बाहेर का काढलं नाही? वाचा ही रहस्यमय गोष्ट!
 

Web Title: Nora Farehi dance wearing a sports bra video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.