ना कसला देखावा, ना कसला गर्व; मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्या रायचा साधेपणा चाहत्यांना भावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:37 AM2023-06-15T11:37:37+5:302023-06-15T11:37:59+5:30

Aishwarya Rai Bachchan : सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत पाहायला मिळत आहे की, माजी मिस वर्ल्ड आपल्या आईसोबत जमिनीवर बसून जेवत आहे.

No show, no pride; After becoming Miss World, fans felt the simplicity of Aishwarya Rai | ना कसला देखावा, ना कसला गर्व; मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्या रायचा साधेपणा चाहत्यांना भावला

ना कसला देखावा, ना कसला गर्व; मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्या रायचा साधेपणा चाहत्यांना भावला

googlenewsNext

सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होताना दिसतात. काही फोटो खूप छान असतात तर काही फोटो पाहून चाहते चकीत होतात. दरम्यान सोशल मीडियावर ऐश्वर्या राय(Aishwarya Rai Bachchan)चा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत पाहायला मिळत आहे की, माजी मिस वर्ल्ड आपल्या आईसोबत जमिनीवर बसून जेवत आहे. लोकांना ऐश्वर्याचा हा अंदाज खूप भावत आहे. या फोटोत पाहायला मिळत आहे की, ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचा ताज घातलेला दिसत आहे. आई सोबत जेवणाचा आस्वाद लुटताना दिसते आहे.

ऐश्वर्या राय बच्चनचा व्हायरल होत असलेल्या फोटोत पाहायला मिळत आहे की, ती जमिनीवर बसून जेवते आहे. यावेळी तिच्यासोबत तिची आईदेखील उपस्थित आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचा साधेपणा चाहत्यांना खूपच भावतो आहे. 

फक्त सौंदर्यचंच नाही तर आपल्या टॅलेंटच्या जोरावर ऐश्वर्या राय हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. जेव्हा तिने हा ताज घातला त्यावेळी ती फक्त २१ वर्षांची होती. तिने ८६ देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला होता. आजही ऐश्वर्याच्या सौंदर्यांची जगभर चर्चा होताना दिसते. या स्पर्धेनंतर ऐश्वर्याला सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर तिने अभिनयाला आपले प्रोफेशन बनवले. शेवटची ऐश्वर्या नुकतीच पोन्नियन सेल्वन २ मध्ये झळकली आहे.
 

Web Title: No show, no pride; After becoming Miss World, fans felt the simplicity of Aishwarya Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.