नो प्रॉप्स, नो स्टुडिओ... असे शूट झाले ‘अक्टूबर’चे प्रमोशनल कॅम्पेन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 11:42 IST2018-01-22T06:12:06+5:302018-01-22T11:42:06+5:30
वरूण धवन आणि बनिता संधू स्टारर ‘अक्टूबर’ या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. शुजीत सरकार दिग्दर्शित या बहुप्रतिक्षीत ...

नो प्रॉप्स, नो स्टुडिओ... असे शूट झाले ‘अक्टूबर’चे प्रमोशनल कॅम्पेन!
रूण धवन आणि बनिता संधू स्टारर ‘अक्टूबर’ या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. शुजीत सरकार दिग्दर्शित या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे प्रमोशन सध्या धडाक्यात सुरु आहे. याचअंतर्गत काल ‘अक्टूबर’चा प्रमोशन कॅम्पेनचे शूट पार पडले. या शूटचे वैशिष्ट्य म्हणजे, हे अख्खे शूट कुठल्याही कृत्रिम दिव्यांऐवजी सूर्याच्या प्रकाशात पार पडले. म्हणजे, यासाठी पूर्णपणे नॅचरल लाईट्सचा वापर करण्यात आला. कुठलाही स्टुडिओ नाही, कुठलाही सेट नाही, कुठलाही प्रॉप्स नाही अशापद्धतीने पार पडलेले हे आऊटडोअर शूट त्यामुळेच वैशिष्ट्यपूर्ण ठरले. सुप्रसिद्ध फोटोग्राफर जतीन कमपानी यांनी हे शूट केले. निश्चितपणे वरूणसह अख्ख्या टीमसाठी हा एक आगळा-वेगळा अनुभव ठरला.
या शूटशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, आम्ही काल एका आऊटडोअर लोकेशनवर ‘अक्टूबर’चे प्रमोशनल कॅम्पेन शूट केले. निसर्गाच्या सानिध्यात पूर्णपणे नैसर्गिक प्रकाशात पार पडलेले हे शूट एक अविस्मरणीय आनंद होता.
![]()
‘अक्टूबर’ या चित्रपटात वरूण धवनसोबत बनिता संधू हा नवा चेहरा दिसणार आहे. एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही.
ALSO READ : वरूण धवनची ‘अक्टूबर’ गर्ल कोण कुठली? जाणून घ्या तिच्याबद्दल!
‘अक्टूबर’ या चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत सरकार ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल.