पोस्टपोन होणार नाही Yashचा KGF Chapter 2, अभिनेत्याच्या बर्थडेच्या दिवशी शेअर केलं नवीन पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 14:57 IST2022-01-08T14:56:08+5:302022-01-08T14:57:11+5:30

Happy Birthday Yash: सुपरस्टार यश आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे.

No Postpone Yash's KGF Chapter 2, shared a new poster on the actor's birthday | पोस्टपोन होणार नाही Yashचा KGF Chapter 2, अभिनेत्याच्या बर्थडेच्या दिवशी शेअर केलं नवीन पोस्टर

पोस्टपोन होणार नाही Yashचा KGF Chapter 2, अभिनेत्याच्या बर्थडेच्या दिवशी शेअर केलं नवीन पोस्टर

सुपरस्टार यश (Yash) आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. यशने त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट KGF Chapter 2 चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत यशने पोस्टर शेअर करून वचन दिले आहे की हा चित्रपट एप्रिल २०२२ मध्येच प्रदर्शित होईल.

मागील वर्षी, सुपरस्टार यशच्या वाढदिवशी, 'KGF Chapter 2' च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. चाहत्यांच्या विनंतीनंतर हा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये यशची मस्त स्टाइल पाहायला मिळाली. यासोबतच संजय दत्तच्या अधेरा या व्यक्तिरेखेची झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली.


आता यशच्या 'KGF Chapter 2' चे नवीन पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये यशचे पात्र रॉकी भाई रागात उभा असलेला दिसतो आहे. तो काहीतरी विचार करत आहे, असे दिसते. यशच्या शेजारी एक धोक्याचे चिन्ह आहे ज्यावर लिहिले आहे - सावध राहा, पुढे धोका आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट १४ एप्रिल २०२२ देण्यात आली आहे. याचाच अर्थ निर्मात्यांनी हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे.

KGF चित्रपटाचा सिक्वेल

'KGF Chapter 2' हा २०१८ मध्ये आलेल्या KGF चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट गरुडशी लढत होती. आता नव्या चित्रपटात तो अधीराशी स्पर्धा करणार आहे. संजय दत्त अधीराची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि इतर कलाकार आहेत.

Web Title: No Postpone Yash's KGF Chapter 2, shared a new poster on the actor's birthday