SHOCKING ! अभिनेत्री निवेथाने ऑनलाईन ऑर्डर केलं जेवण, भातात सापडलं झुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 01:14 PM2021-06-25T13:14:42+5:302021-06-25T13:15:04+5:30

अभिनेत्री निवेथा पेठूराजने स्विगीवरून जेवण ऑर्डर केलं होतं. जेव्हा तिने पार्सल ओपन केलं तेव्हा तिला पार्सलमध्ये मृत झुरळ दिसलं.

Nivetha Pethuraj finds cockroach in food, Swiggy takes Chennai restaurant off app | SHOCKING ! अभिनेत्री निवेथाने ऑनलाईन ऑर्डर केलं जेवण, भातात सापडलं झुरळ

SHOCKING ! अभिनेत्री निवेथाने ऑनलाईन ऑर्डर केलं जेवण, भातात सापडलं झुरळ

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेथा ही साऊथची मोठी अभिनेत्री आहे. विजय सेतुपती व राशी खन्ना स्टारर संगथामिजन या सिनेमात ती अखेरची दिसली होती.

साऊथच्या अनेक हिट सिनेमांमध्ये झळकलेली तामिळची प्रसिद्ध अभिनेद्धी निवेथा पेठूराजने जेवण ऑर्डर केले आणि धक्कादायक म्हणजे, तिच्या या जेवणात दोन मृत झुरळ दिसलेत. यानंतर अभिनेत्री जेवणातील या झुरळांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, रेस्टॉरंटवर चांगलीच भडास काढली आहे.
निवेथाने ऑनलाईन जेवणाचे पार्सल मागवले होते. तिने स्विगीवरून जेवण ऑर्डर केले होते.  पार्सल ओपन केलं तेव्हा तिला पार्सलमध्ये मृत  झुरळ दिसले. त्यानंतर निवेथाने तात्काळ सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले. शिवाय अनेक पोस्ट करत, ग्राहकांना निकृष्ट जेवण पुरवणा-या अशा रेस्टॉरंटवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

 माझ्या जेवणात मला झुरळ आढळले. असे एकदा नाही तर दोनदा झालेय. याआधीही माझ्या जेवणात झुरळ आढळले होते. असे जेवण पुरवणा-या   रेस्टॉरंटवर कडक कारवाई व्हायला हवी. शिवाय अशा रेस्टोरेंट्सवर दंड देखील आकारायला हवा, असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान अभिनेत्रीची ही पोस्ट व्हायरल होताच स्विगी माफी देखील मागितली आहे. 

‘तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे आम्ही आभारी आहोत आमची टीम मार्वल यावर कारवाई करेल. काळजी करू नका, ही तक्रार रेस्टॉरंटमध्ये पाठविली गेली आहे,’ असे स्विगीने म्हटले आहे.
निवेथाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आपल्यासोबतही असेच घडले असल्याची तक्रार केली आहे.
निवेथा ही साऊथची मोठी अभिनेत्री आहे. विजय सेतुपती व राशी खन्ना स्टारर संगथामिजन या सिनेमात ती अखेरची दिसली होती. लवकरच ती विराट पर्वम या सिनेमात दिसणार आहे. यात ती साई पल्लवी, राणा दुग्गबती व प्रियामणीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा सिनेमा गेल्या 30 एप्रिलला रिलीज होणार होता. पण कोव्हिडमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. 

Web Title: Nivetha Pethuraj finds cockroach in food, Swiggy takes Chennai restaurant off app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood