माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:17 IST2025-11-11T11:16:08+5:302025-11-11T11:17:35+5:30
तसाच चेहरा, तीच स्माईल..कोण आहे ही?

माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित हिंदी सिनेविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ९० दशकात तिच्या अभिनयाने, सौंदर्याने, नृत्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. माधुरीच्या कित्येक गाण्यांवर आजही लोक थिरकतात. तिला 'लेडी सुपरस्टार'अशीही ओळख मिळाली होती. दरम्यान माधुरीची कार्बन कॉपी म्हणवली जाणारी एक अभिनेत्री होती. कोण आहे ती आणि सध्या कुठे आहे?
ही अभिनेत्री आहे निकी वालिया. माधुरी दीक्षितसारखी दिसते म्हणून तिला खूप लोकप्रियता मिळाली. सिनेमेही मिळाले. अनिल कपूरसारख्या सुपरस्टार्ससोबत तिने काम केलं. निकीच्या अदाकारीवर बॉलिवूडही फिदा झालं होतं. 'मिस्टर आजाद','मोहरे ','लुप्त','नीयत' या सिनमांमध्ये ती दिसली. याशिवाय तिने १९९५ ते २०१७ पर्यंत टेलिव्हिजनवरही काम केलं. पण हळूहळू ती ग्लॅमर विश्वापासून दूर होत गेली. तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. आजही तिच्याकडे पाहून माधुरी दीक्षितचाच भास होतो. निकीने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
अगदी तसाच चेहरा, तेच डोळे आणि तशीच स्माईल, निकी वालिया आजही माधुरीची कार्बन कॉपीच दिसते. निकीने करिअरच्या पीकवर असताना बॉलिवूडला रामराम केला. इतकंच नाही तर २००२ साली ती देश सोडून युकेला शिफ्ट झाली. पती सोनी वालियासोबत ती संसारात रमली आहे. निकीला सीन हा मुलगा आणि सबरीना ही मुलगी आहे. निकी आज ५३ वर्षांची आहे.