‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रासाठी पुन्हा एकदा भारतात येणार निक जोनास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 20:14 IST2018-07-02T20:08:05+5:302018-07-02T20:14:52+5:30

गत गुुरूवारी रात्री प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना झाली आणि या कथित जोडप्याचा भारत दौरा संपला. पण कदाचित तात्पुरताच.

Nick Jonas will be back in India for Priyanka Chopra | ‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रासाठी पुन्हा एकदा भारतात येणार निक जोनास!

‘लेडी लव्ह’ प्रियांका चोप्रासाठी पुन्हा एकदा भारतात येणार निक जोनास!

प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेन्ड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेलेत. दोघेही सुमारे आठवडाभर भारतात होते. या भेटीचा उद्देश तुम्हाला ठाऊक आहेच. खास प्रियांकाच्या आईला व कुटुंबाला भेटायला निक भारतात आला होता. भारतात निक व प्रियांका अगदी बिनधास्त एकत्र फिरले, हातात हात घालून पार्ट्यांना पोहोचलेत. एकंदर काय तर दोघांनीही आपल्या रिलेशनशिपची अप्रत्यक्षपणे कबुली दिली.  यानंतर गत गुुरूवारी रात्री प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना झाली आणि या कथित जोडप्याचा भारत दौरा संपला. पण कदाचित तात्पुरताच. होय, ताजी बातमी खरी मानाल तर निक लवकरच पुन्हा एकदा भारतात येणार आहे आणि याला कारण अर्थात त्याची लेडी लव्ह प्रियांका चोप्रा हीच असणार आहे.
होय, येत्या काही दिवसांत प्रियांकाच्या ‘भारत’ या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे शूटींग सुरू होईल आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत संपेल,अशी शक्यता आहे. साहजिकचं या शूटींगसाठी प्रियांका भारतात असणार आहे. आता प्रियांका भारतात अन् निक अमेरिकेत हे तर शक्यचं नाही. इतका विरह दोघांनाही सहन होण्यासारखा नाही़. त्यामुळेचं या काळात निक पुन्हा भारतात येऊ शकतो. या भारतभेटीपूर्वी काही पूर्वनियोजित कामे हातावेगळी करण्याचे त्याचे प्रयत्न आहेत. एकंदर कार तर निक व प्रियांकाचे नवे नवे प्रेम पुन्हा एकदा बहरताना पाहण्याची संधी तिच्या भारतीय चाहत्यांना मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निक जोनस याच्याशी तिचे नाव जोडले जात आहे.  अलीकडे प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली.  प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नाही. 

२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती.

 

 

Web Title: Nick Jonas will be back in India for Priyanka Chopra