प्रियंका चोप्रासाठी निक बनला फोटोग्राफर, भररस्त्यात सुरु झाले फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 17:18 IST2020-12-16T17:18:20+5:302020-12-16T17:18:42+5:30

बायकोसाठी काहीही...

nick jonas spotted clicking priyanka chopra photo on road during film shooting | प्रियंका चोप्रासाठी निक बनला फोटोग्राफर, भररस्त्यात सुरु झाले फोटोशूट

प्रियंका चोप्रासाठी निक बनला फोटोग्राफर, भररस्त्यात सुरु झाले फोटोशूट

ठळक मुद्दे बॉलिवूडच्या एका सिनेमातही प्रियंका झळकणार आहे. ‘द व्हाइट टायगर’ असे या सिनेमाचे नाव आहे.

बायकोवर जिवापाड प्रेम करणारा नवरा तिचा हट्ट पुरवणार नाही तर काय? आणि तसेही स्त्री हट्टापुढे कोणाचे काहीही चालत नाही. आता प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचेच उदाहरण घ्या. प्रियंकाला भररस्त्यात फोटो काढण्याचा मोह झाला आणि निक तिच्यासाठी फोटोग्राफर बनला. 
तर प्रियंका व निक सध्या लंडनमध्ये आहेत. प्रियंका तिथे ‘टेक्स फॉर यू’ या सिनेमाचे शूटींग करतेय. तिच्यासोबत निकसुद्धा या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे शूटींगच्या निमित्ताने दोघेही लंडनमध्ये पोहोचले. कामाच्यावेळी काम आणि फावल्या वेळात भटकंती, असे करत दोघेही लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले. यादरम्यान निक प्रियंकाचे भररस्त्यात फोटो काढताना दिसला.

प्रियंकाचा ‘टेक्स फॉर यू ’ हा सिनेमा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. अलीकडे प्रियंका निकला चक्क कारमधून उतरवत त्याला शिव्या घालते, असा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. पण हा ‘टेक्स फॉर यू ’ याच सिनेमातील एक सीन होता.  जीम स्ट्रॉसे या प्रसिद्ध लेखकाने चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे.  

याशिवाय बॉलिवूडच्या एका सिनेमातही प्रियंका झळकणार आहे. ‘द व्हाइट टायगर’ असे या सिनेमाचे नाव आहे. यात प्र्रियंकासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडे   या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा आहे. प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.  यात प्रियंका, राजकुमार रावए आदर्श गौरव एकत्र दिसणार आहेत.  ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Web Title: nick jonas spotted clicking priyanka chopra photo on road during film shooting