किती गोड! लेक मालतीसोबत दिसलं निक जोनासचं बॉन्डिंग, बाप-लेकीच्या क्युट जोडीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:05 IST2023-06-13T12:15:33+5:302023-06-13T16:05:27+5:30

बाप लेकीच्या या क्युट जोडीवर नेटकरी अक्षरश: फिदा झाले.

Nick jonas share a picture with malti merry chopra jonas | किती गोड! लेक मालतीसोबत दिसलं निक जोनासचं बॉन्डिंग, बाप-लेकीच्या क्युट जोडीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

किती गोड! लेक मालतीसोबत दिसलं निक जोनासचं बॉन्डिंग, बाप-लेकीच्या क्युट जोडीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

निक जोनासप्रियंका चोप्रावर किती प्रेम करतो हे कोणापासून लपून राहिलेले नाही. निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. या पॉवर कपलची लेक मालती देखील चर्चेत राहते. अनेकदा तिच्या क्युट फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला असतो. आता अलीकडेच निकने मालतीसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये वडील आणि लेकीचं बॉन्डिंग दिसत आहेत.

निक जोनासने नुकताच मालतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मालतीला आपल्या कडेवर घेतलेला दिसत आहे. या फोटोमध्ये निक मालतीकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. तर मालती कॅमेराकडे बघत आहे. ती तिच्या वडिलांच्या कडेवर शांतपणे बसली आहे आणि खूप गोंडस दिसत आहे. दरम्यान, निक ब्लॅक प्रिंटेड टी-शर्टमध्ये नेहमीसारखा हँडसम दिसतो आहे, तर मालती निळ्या रंगाचा फ्रॉकमध्ये गोंडस दिसतेय आहे. या फोटोसोबत निकने हार्ट इमोजी शेअर केला आहे. मालतीचा निकसोबतचा हा फोटोही तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे, नेटकरी या फोटोवर फिदा झालेत. 


निक जोनास आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतो, प्रियंका देखील आपल्या मुलीसाठी आणि नवऱ्यासाठी वेळ काढण्यास विसरत नाही. प्रियंका तिच्या व्यस्त वेळापत्रकानंतरही अनेकदा मुलगी मालतीसोबत खेळतानाचे फोटो शेअर करत असते. निक आणि प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रितीरिवाजांनी विवाह केला.
 

Web Title: Nick jonas share a picture with malti merry chopra jonas