Priyanka Nick Wedding : हातात चुडा, भांगात कुंकू...लग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रियांकाची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 10:06 IST2018-12-04T10:06:12+5:302018-12-04T10:06:58+5:30

प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. पण लग्न झाल्यानंतरचे प्रियांका व निकचे फोटो मात्र समोर आले आहेत.

Newly wed Priyanka Chopra and Nick Jonas pose for shutterbugs while leaving Jodhpur | Priyanka Nick Wedding : हातात चुडा, भांगात कुंकू...लग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रियांकाची झलक!

Priyanka Nick Wedding : हातात चुडा, भांगात कुंकू...लग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रियांकाची झलक!

ठळक मुद्देदोघांनीही मीडियाला हात जोडून अभिवादन केले. यानंतर दोघेही जोधपूर विमानतळाकडे रवाना झालेत.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता अमेरिकन सिंगर निक जोनासची पत्नी झालीय. गत १ डिसेंबरला प्रियांका व निक दोघेही ख्रिश्चन पद्धतीने लग्नबेडीत अडकले. यानंतर २ डिसेंबरला दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्नगाठ बांधली. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. पण लग्न झाल्यानंतरचे प्रियांका व निकचे फोटो मात्र समोर आले आहेत.

होय, चार दिवस चाललेल्या लग्नसोहळ्यानंतर काल रात्री उशीरा प्रियांका व निक दोघांनीही मीडियाला पोज दिली. जोधपूरच्या मीडियाला अभिवादन करत निकयांकाने सगळ्यांचे आभार मानलेत.

यावेळी प्रियांका कमालीची सुंदर दिसत होती. हिरव्या रंगाची साडी, हातातला चुडा, भांगातील कुंकू अशा सौभाग्यलंकारासह प्रियांका दिसली. तर निक कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

दोघांनीही मीडियाला हात जोडून अभिवादन केले. यानंतर दोघेही जोधपूर विमानतळाकडे रवाना झालेत.


प्रियांका व निकच्या लग्नात सामील झालेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर निकने प्रियांकाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्याचे ते शब्द ऐकून प्रियांका कमालीची भावूक झाली. लग्नातील सात वचनांवर खरा उतरण्याचा मी प्रयत्न करेल. प्रियांकाला नेहमी आनंदी ठेवेल, असे वचन निकने दिले.

हे ऐकून प्रियांकाचे डोळे पाणावले. निकच्या गळ्यात वरमाला घालतानाही प्रियांका वडिलांच्या आठवणीने अशीच भावूक झाली होती. यावेळी निकने तिला सांभाळले होते.
जोधपूरवरून प्रियांका व निकचे सगळे कुटुंब दिल्लीला रवाना झाले. आज दिल्लीत प्रियांका व निकचे वेडिंग रिसेप्शन आहे. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहतील, असे मानले जात आहे.

Web Title: Newly wed Priyanka Chopra and Nick Jonas pose for shutterbugs while leaving Jodhpur