रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात आलीय आता नवीन कमली, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:00 IST2019-12-19T07:00:00+5:302019-12-19T07:00:00+5:30

कमली या गाण्यावरील तिच्या परफॉर्मन्स वर परीक्षक सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य दोघांनीही दाद दिली .

Newcomer Aayushi Bhave has come to the city to Entertain You, Who Is She ? | रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात आलीय आता नवीन कमली, कोण आहे ती?

रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात आलीय आता नवीन कमली, कोण आहे ती?

कतरीना कैफ चे  कमली हे गाणं आठवतंय?  पण आता यापुढे तुम्ही हे गाणं ही विसराल आणि त्या कमली चा परफॉर्मन्स सुद्धा .. कारण आता शहरात आलीय आता नवीन कमली आणि ही नवी कमली आहे युवा डान्सिंग क्वीन मधली सुपर स्टार परफॉर्मर आयुषी भावे. यात एकूण १४ सेलिब्रिटी डान्सर्स एकमेकींशी युवा डान्सिंग क्वीन होण्यासाठी झुंज देणार आहेत.

 


आयुषी भावे हे नाव पहिल्यांदा पुढे आलं एका सौंदर्य स्पर्धेमुळे. दिसायला अतिशय सुंदर आणि त्याचबरोबर डोळ्यात एक वेगळीच चमक घेऊन आलेली आयुषी त्यानंतर तिच्या नृत्य कौशल्यामुळे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात  आणि इव्हेंट्समध्ये दिसू लागली . त्याचबरोबर तिची पॉप्युलॅरीटीसुद्धा वाढू लागली. हळू हळू ती एक उत्तम डान्सर म्हणून तिची ओळख वाढू लागली . त्याच वेळीस झी युवा या वाहिनीवर युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाची निवड प्रक्रिया सुरु झाली होती . एक सौंदर्यवती आणि नर्तिका असे दोन्ही गुण तिच्यात असल्यामुळे लगेच तिची निवड करण्यात आली . आणि तिच्या पहिल्याच परफॉर्मन्स मधून ती कोणत्याही बाबतीत कमी नाही हे तिने दाखवून दिले आहे . 


कमली या गाण्यावरील तिच्या परफॉर्मन्स वर परीक्षक सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य दोघांनीही दाद दिली . सोनालीने मला तुला युवा डान्सिंग क्वीनचा मुकुट घालायला आवडेल तर मयूर ने तिला इंटरनॅशनल सुपर डान्सर ची उपमा दिली . युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात आयुषी भावेचे आणखीही भरपूर परफॉर्मन्स आपल्याला पुढच्या भागात पहायला मिळतील .

Web Title: Newcomer Aayushi Bhave has come to the city to Entertain You, Who Is She ?