नवजात बाळावरही चढला 'पुष्पा'चा फिव्हर..!, व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनही होईल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:50 IST2022-03-09T17:50:03+5:302022-03-09T17:50:39+5:30
नवजात बाळाचा 'पुष्पा' फिव्हरवाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नवजात बाळावरही चढला 'पुष्पा'चा फिव्हर..!, व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनही होईल थक्क!
सध्या सगळीकडेच पुष्पा (Pushpa Movie) सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाचं कथानक, पुष्पाची स्टाईल, सिनेमातील गाणी आणि डायलॉगचं नेटकऱ्यांकडून बरंच कौतुक होते आहे. या सिनेमातील पुष्पराज झुकेगा नही साला... हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग बनलाय आणि त्यावर अल्लू अर्जून(Allu Arjun)ने केलेली स्टेपही व्हायरल झाली. आता मात्र पुष्पाची ही स्टेप एका नवजात बालकानेही केलीय. या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
पुष्पाचा हा छोटा फॅन आहे एक नवजात बाळ. या नवजात बाळाने पुष्पाच्या डायलॉगवर स्टेप केलेली पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत राज करने को आया मैं.... असं लिहिलयं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
श्रेयस तळपदेने पुष्पा सिनेमातील हिंदी व्हर्जनला आवाज दिला आहे. पुष्पा सिनेमात त्याने अल्लू अर्जूनला जो आवाज दिला आहे तो कम्माल आहे. पुष्पा सिनेमा हिदींत हिट होण्यामागे श्रेयसचं खूप मोठं योगदान आहे. पुष्पासाठी श्रेयसने दिलेला आवाज इतका फेमस झालाय की त्याची जादू सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंतही पोहचली आहे. श्रेयस सध्या आपल्याला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत पाहायला मिळतोय. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे.